ताज्या बातम्या

Air India Plane Crash : 'त्या' दुर्घटनेच्या सात दिवसांनंतर रोशनी सोनघरेचा मृतदेह डोंबिवलीत दाखल; लेकीला पाहून आईनं फोडला हंबरडा

अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडियांच्या भीषण अपघातात विमानातील 241 प्रवाशांसाह ते विमान ज्या मेडिकल कॉलेजच्या इमारतीवर पडलं, तेथील विद्यार्थी डॉक्टर्स मिळून आतापर्यंत 270 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Published by : Rashmi Mane

अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडियांच्या भीषण अपघातात विमानातील 241 प्रवाशांसाह ते विमान ज्या मेडिकल कॉलेजच्या इमारतीवर पडलं, तेथील विद्यार्थी डॉक्टर्स मिळून आतापर्यंत 270 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामध्ये डोंबिवलीमधील रोशनी सोनघरे या हवाईसुंदरीचा ही दुर्दैवी अंत झाला. डोंबिवलीमध्ये राहणाऱ्या रोशनीचे एअर इंडियाच्या विमान अपघातामध्ये निधन झाले. या विमान अपघातानंतर एक आठवड्यानंतर तिचा मृतदेह तिच्या डोंबिवलीच्या राहत्या घरी आणण्यात आला. सोनघरे कुटुंबावर रोशनीच्या अशा जाण्याने दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

रोशनी ही अत्यंत महत्वाकांक्षी मुलगी होती. हवाई सुंदरी होण्याचे तिचे लहानपणापासूनचे स्वप्न होते. घरची परिस्थिती बेताची असली तिच्या वडिलांनी रोशनीचे हवाईसुंदरी होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यास खूप मदत केली. शिवाय रोशनीनेही स्वतःच्या हिमतीच्या जोरावर लहानपणापासूनचे स्वप्न पूर्ण केले. डोंबिवली पूर्वेकडील उमिया इमारतीत आई राजश्री, वडील राजेंद्र आणि भाऊ विघ्नेश यांच्या समवेत रोशनी राहत होती. तिने आपल्या स्वप्नांना भरारी देत 2021 मध्ये सर्वात पहिले स्पाइस जेटमध्ये नोकरी केली. त्यानंतर दोन वर्षांपूर्वीच रोशनी एअर इंडियामध्ये रुजू झाली होती. लंडनला जाण्याच्या आनंदात ती घरच्यांचा निरोप घेऊन निघाली, ती परत आलीच नाही. एअर इंडियाच्या विमान अपघाताची बातमी कळताच तिचे वडील आणि मर्चंट नेव्हीमध्ये असलेला भाऊ तातडीने अहमदाबादला रवाना झाले होते. या भीषण विमान अपघातामध्ये हवाई सुंदरी रोशनी सोनघरे हिलाही आपले प्राण गमवावे लागले.

डीएनए चाचणी पूर्ण झाल्यावर तब्बल एका आठवड्यानंतर रोशनीचा मृतदेह तिच्या घरी आणण्यात आले. रोशनीला असे पाहून तिच्या आईची अवस्था खूपच बिकट झाली होती. रोशनीला अशा स्थिती परतलेले पाहून तिच्या आईने हंबरडा फोडला. पाणावलेल्या डोळ्यांनी आणि अत्यंत जड अंतःकरणाने रोशनीला अखेरचा निरोप दिला गेला. डोंबिवलीत तिच्या अंत्ययात्रेला कुटुंबीय, मित्रपरिवार आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

हेही वाचा

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Asia Cup 2025 : ब्रोंको टेस्ट पास करा तरचं संघात चान्स! BCCI चा नवा नियम; ब्रोंको टेस्ट म्हणजे काय? Bronco Test

Rohit Pawar : शिखर बँक घोटाळाप्रकरणी आमदार रोहित पवारांची जातमुचलक्यावर सुटका

Raigad Boat Accident : रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, बचावकार्य युद्धपातळीवर

Latest Marathi News Update live : रायगडच्या उरणजवळ समुद्रात बोट बुडाली