ताज्या बातम्या

Air India-Vistara Merge: एअर इंडिया-विस्तारा विलीनीकरण; प्रवाशांसाठी काय बदल?

एअर इंडिया आणि विस्तारा या दोन्ही विमान वाहतूक कंपन्या टाटा समूहाच्या असून विस्तारा हा टाटा आणि सिंगापूर एअरलाइन्सचा संयुक्त उपक्रम आहे.

Published by : Team Lokshahi

काल 11 नोव्हेंबरला विस्तारा या विमान वाहतूक कंपनीच्या विमानाने शेवटचे उड्डाण केले. विस्ताराची शेवटची फ्लाइट ‘UK 115’ सोमवारी रात्री 11.45 वाजता दिल्लीहून सिंगापूरला निघाली. एअर इंडिया आणि विस्तारा या दोन्ही विमान वाहतूक कंपन्या टाटा समूहाच्या असून विस्तारा हा टाटा आणि सिंगापूर एअरलाइन्सचा संयुक्त उपक्रम आहे.

आज (12 नोव्हेंबर) एअर इंडिया कंपनीच्या विलीनिकरनानंतर विस्तारा-एअर इंडियाच्या पहिल्या विमानाने यशस्वी उड्डाण केलं आहे. सोमवारी रात्री 10.07 वाजता एअर इंडिया-विस्तारा युनिटचे ‘AI2286’ या कोडचे पहिले उड्डाण दोहाहून मुंबईसाठी रवाना झाले आणि मंगळवारी सकाळी मुंबईला पोहोचले.

एअर इंडिया आणि विस्ताराच्या विलीनीकरणानंतर युनिटचे हे पहिले आंतरराष्ट्रीय उड्डाण आहे. या विलीनीकरणानंतर, विस्तारित एअर इंडियामध्ये सिंगापूर एअरलाइन्सची 25.1% भागीदारी असणार आहे.

विलीनीकरणानंतर विस्तारा प्रवाशांसाठी काय बदल होणार?

विस्तारा तिकीट असलेले 1,15,000 हून अधिक प्रवासी विलीनीकरणानंतर पहिल्या महिन्यात एअर इंडियाच्या नावाने उड्डाण करतील. विस्ताराचा अनुभव बदलला जाणार नाही, अशी ग्वाही देखील एअर इंडिया कंपनीने दिली आहे. विलीनीकरणानंतर विस्तारा एअरलाइन्सच्या फ्लाइट कोडमध्ये ‘2’ हा अंक जोडला जाईल. उदाहरणार्थ, विस्ताराचा फ्लाइट कोड UK955 होता, जो आता AI2955 होईल.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा