ताज्या बातम्या

Air pollution : वायू प्रदूषणाचा विळखा, देशातील अनेक शहरं गंभीर संकटात

देशातील अनेक शहरांमध्ये वायू प्रदूषणाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून, राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक भाग अक्षरशः धुराच्या विळख्यात सापडले आहेत.

Published by : Varsha Bhasmare

देशातील अनेक शहरांमध्ये वायू प्रदूषणाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून, राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक भाग अक्षरशः धुराच्या विळख्यात सापडले आहेत. ही समस्या केवळ हंगामी नसून, दीर्घकालीन आणि संरचनात्मक कारणांमुळे निर्माण झाल्याचं स्पष्ट होत आहे. सातत्याने होणारे औद्योगिक उत्सर्जन, वाहतुकीतून निघणारे धूरकण, बांधकामधूळ आणि ऊर्जा उत्पादनातील प्रदूषण हे प्रमुख कारणे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअर (CREA) यांनी केलेल्या अलीकडील विश्लेषणात चिंताजनक वास्तव समोर आले आहे. देशातील टॉप १० सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी सात शहरे दिल्ली–NCR परिसरात असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. उपग्रह डेटाचा वापर करून CREA ने देशातील ४,०४१ शहरांमध्ये PM2.5 पातळीचे मूल्यांकन केले. यापैकी १,७८७ शहरांमध्ये २०१९ ते २०२४ या पाच वर्षांच्या कालावधीत दरवर्षी राष्ट्रीय मानकांपेक्षा जास्त PM2.5 पातळी नोंदवण्यात आली. कोविड-१९मुळे २०२० हे वर्ष या अभ्यासातून वगळण्यात आले आहे.

PM2.5 म्हणजे हवेतील अतिसूक्ष्म कण, ज्यांचा व्यास २.५ मायक्रोमीटर किंवा त्यापेक्षा कमी असतो. हे कण इतके लहान असतात की ते थेट श्वासावाटे फुफ्फुसांमध्ये प्रवेश करतात. यामुळे दमा, ब्राँकायटिस, हृदयविकार, रक्तवाहिन्यांचे आजार तसेच अकाली मृत्यूचा धोका वाढतो, असा इशारा आरोग्यतज्ज्ञ देत आहेत.

या गंभीर परिस्थितीतही केंद्र सरकारच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमात (NCAP) केवळ १३० शहरांचा समावेश करण्यात आला आहे, ही बाब अधिकच चिंताजनक ठरते. CREA च्या अहवालानुसार, दीर्घकाळापासून प्रदूषित असलेल्या १,७८७ शहरांपैकी केवळ ६७ शहरे NCAP अंतर्गत येतात, म्हणजेच अवघ्या ४ टक्के शहरांमध्येच या योजनेद्वारे प्रदूषणावर उपाययोजना राबवता येत आहेत.

दरम्यान, २०२५ च्या PM2.5 प्रक्षेपणानुसार आसाममधील बिरनिहाट, दिल्ली आणि गाझियाबाद ही देशातील सर्वाधिक प्रदूषित शहरे ठरली आहेत. बिरनिहाटमध्ये PM2.5 चे प्रमाण १०० मायक्रोग्राम प्रति घनमीटर, दिल्लीत ९६ मायक्रोग्राम, तर गाझियाबादमध्ये ९३ मायक्रोग्राम प्रति घनमीटर नोंदवण्यात आले आहे. तज्ज्ञांच्या मते, वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी केवळ काही शहरांपुरत्या उपाययोजना पुरेशा नाहीत. देशपातळीवर व्यापक धोरण, कठोर अंमलबजावणी आणि स्वच्छ ऊर्जा पर्यायांकडे वेगाने वाटचाल केल्याशिवाय ही समस्या आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा