air pollution in delhi 
ताज्या बातम्या

दिल्ली-एनसीआरची हवा 'विषारी'

थंडी वाढत असताना प्रदूषणाची पातळीही झपाट्याने वाढत आहे. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की सरकारला ग्रेप-3 अंतर्गत निर्बंध लादावे लागले आहेत. राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील वायू प्रदूषण 'गंभीर पातळी' वर पोहोचले आहे.

Published by : Team Lokshahi

दिल्ली-एनसीआरची हवा 'विषारी' होत आहे. पुन्हा एकदा राजधानीचे गॅस चेंबरमध्ये रूपांतर होताना दिसत आहे. थंडी वाढत असताना प्रदूषणाची पातळीही झपाट्याने वाढत आहे. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की सरकारला ग्रेप-3 अंतर्गत निर्बंध लादावे लागले आहेत. राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील वायू प्रदूषण 'गंभीर पातळी' वर पोहोचले आहे.

कमिशन फॉर एअर क्वालिटी मॅनेजमेंट (CAQM) ने आजपासून दिल्ली-NCR मध्ये ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन (GRAP) चा तिसरा टप्पा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. GRAP-3 लागू झाल्यानंतर अनेक निर्बंध लादले जातात. रस्त्यावर उडणारे धुळीचे ढग शांत करण्यासाठी पाण्याचे स्प्रिंकलर सोडले जात असताना, डिझेलवर चालणाऱ्या मालवाहू वाहनांनाही कडक बंदी घालण्यात येणार आहे. याचा परिणाम मुलांच्या शाळांवरही होणार आहे, त्यामुळे GRAP-3 अंतर्गत दिल्लीत कोणत्या कामांवर बंदी घालण्यात आली आहे ते आम्ही तुम्हाला सांगतो.

ग्रेप-3 म्हणजे काय?

ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन हा दिल्लीतील प्रदूषणाची पातळी कमी करण्यासाठी डिझाइन केलेल्या उपायांचा संच आहे.

ग्रेप-3 नियमांमुळे निर्बंध

बांधकाम आणि पाडकाम थांबवलं जाणार

सर्व अनावश्यक खाणी बंद असणार

बिगर-इलेक्ट्रिक, बिगर-सीएनजी आणि बिगर-बीएस-५ डिझेल आंतरराज्यीय बसेसवर बंदी

प्राथमिक शाळा बंद, ऑनलाइन वर्ग सुरू करण्याचा सल्ला

रस्त्यांवर पाणी शिंपडणारी वाहनं वाढवण्याचा निर्णय

या धुरक्यामुळे किमान ३०० विमाने व अनेक रेल्वेगाड्यांच्या आगमनावर विपरित परिणाम झाला. दिल्लीतील ३१ भागांत सकाळी प्रदूषण गंभीर श्रेणीत पोहोचल्यावर जाग आलेल्या वायूगुणवत्ता व्यवस्थापन आयोगाला (सोक्यूएएम) जाग आली व त्यांनी उद्यापासून म्हणजेच शुक्रवारपासून ग्रेप म्हणजे ग्रेडेड रिस्पॉन्स अॅक्शन प्लॅन लागू करण्याचा निर्णय घेतला. यामुळे दिल्ली-एनसीआरमध्ये राष्ट्रीय स्तरावर आवश्यक बांधकामे वगळता सर्वसामान्यांच्या नव्या बांधकामांवर पूर्ण बंदी असेल. पाचवीपर्यंतच्या शाळांनाही सुट्टी देण्यात आली आहे.

दिल्लीतील धूळभरल्या रस्त्यांवर पाण्याचा फवारा करणाऱ्या वाहनांची संख्याही वाढविण्यात आली आहे. दाट धुरक्यामुळे दिल्ली विमानतळावर गुरुवारी ३०० हून अधिक उड्डाणांना विलंब झाला. दुपारपर्यंत ११५ विमाने दिल्लीत उतरली व २२६ विमानांचे उड्डाण झाले. विमानांच्या गमनागमनाला सरासरी तास ते दीड तास उशीर होत होता. अनेक रेल्वेगाड्या गुरुवारीही रद्द करण्यात आल्या. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, दिल्ली एनसीआरमध्ये गेल्या २४ तासांत किमान तापमानात घट झाल्यामुळे दिल्लीकरांना यंदाच्या थंडीची पहिली जाणीव झाली आहे. दिल्लीत गुरुवारी कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३० व १४ ते १८ अंश सेल्सिअस राहिले. आगामी किमान आठवडाभर तरी धुरके आणि प्रदूषणाचा दुहेरी फटका दिल्लीकरांना सहन करावा लागू शकतो.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा