Mumbai Air Pollution 
ताज्या बातम्या

Air Pollution : मुंबईची हवा झाली दिल्लीसारखीच! मुंबई वायू प्रदूषणाच्या विळख्यात

सध्या दिवाळीनिमित्त सर्वत्रच फटाक्यांची आतेषबाजी पाहायला मिळत आहे. आता याच फटाक्यांमुळे मुंबईला वायू प्रदूषणाचा विळखा बसल्याचे दिसत आहे. मुंबई शहरात सध्या धूरकट वातावरण पाहायला मिळत आहे.

Published by : Varsha Bhasmare

थोडक्यात

  • मुंबईची हवा झाली दिल्लीसारखीच!

  • मुंबई वायू प्रदूषणाच्या विळख्यात

  • मुंबईकरांच्या प्रकृतीला मोठा धोका

सध्या दिवाळीनिमित्त सर्वत्रच फटाक्यांची आतेषबाजी पाहायला मिळत आहे. आता याच फटाक्यांमुळे मुंबईला वायू प्रदूषणाचा विळखा बसल्याचे दिसत आहे. मुंबई शहरात सध्या धूरकट वातावरण पाहायला मिळत आहे. (Mumbai) मोठ्या प्रमाणात सध्या मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली असून दृश्यमानतेवर आणि नागरिकांच्या आरोग्यावर थेट परिणाम होत आहे. दृश्यमानता मुंबई शहरातील मुख्य महामार्गांवर लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.

मुंबईत शहरभर पसरलेल्या प्रदूषणाने मुंबईचा सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) १३३ वर पोहोचला आहे, जो ‘मध्यम’ श्रेणीत येतो. मात्र, एक्यूआय संकेतस्थळाच्या माहितीनुसार, संपूर्ण मुंबईतील सर्वच प्रमुख ठिकाणची हवा नागरिकांच्या आरोग्यास घातक कॅटेगरीमध्ये आहे. याचा अर्थ शहरातील बहुतांश लोक दूषित हवेत श्वास घेत आहेत. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (CPCB) आकडेवारीनुसार, प्रदूषणाने मुंबईतील काही भागांमध्ये गंभीर पातळी गाठली आहे. भायखळा येथे सर्वाधिक चिंतेची बाब म्हणजे AQI २१३ नोंदवला गेला, जो ‘गंभीर’ हवेची गुणवत्ता दर्शवितो.

यानंतर सिद्धार्थ नगर-वरळी येथे २०४, वांद्रे हिल रोडवर १९१, चेंबूर १८७ आणि देवनार येथे १८७ अशी उच्च पातळीची नोंद आहे. यामुळे शहराच्या अनेक भागांमध्ये हवा अत्यंत दूषित झाली आहे. मंगळवारी सकाळी या भागात दाट धुके आणि कमी दृश्यमानता स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. सरासरी AQI जरी मध्यम असला तरी अनेक ठिकाणी तो २०० च्या पुढे गेल्याने तो अतिसंवेदनशील व्यक्तींना लहान मुले, वृद्ध आणि श्वसनाचे आजार होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

इतकेच नव्हे, तर निरोगी व्यक्तींनाही श्वास घेण्यास त्रास होणे किंवा घसा खवखवणे यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या वाढत्या प्रदूषणामागे अनेक कारणे आहेत. सध्या शहरात हिवाळ्याची सुरुवात झाली आहे. यामुळे वाऱ्याचा वेग मंदावला आहे. या काळात प्रदूषकांचे कण हवेत स्थिर राहून ते विरघळून जात नाहीत. तसेच शहरात मोठ्या प्रमाणातील बांधकामे आणि वाढलेल्या वाहतुकीमुळे होणारे धुळीचे आणि धुराचे उत्सर्जन या प्रदूषणात भर घालत आहे. दिवाळीनंतर फटाक्यांच्या धुरामुळेही हवेची गुणवत्ता काही दिवस खालावली होती

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा