Air Pollution in Mumbai 
ताज्या बातम्या

Air Pollution: मुंबईमध्ये हवेची गुणवत्ता खालावली

मुंबईतील हवेची गुणवत्ता ढासळली आहे. अनेक भागांत वायुप्रदूषणामुळे आरोग्याच्या समस्या वाढत आहेत.

Published by : Gayatri Pisekar

मुंबईतील वायुप्रदूषणाचा मुद्दा चांगलाच ऐरणीवर आला आहे. एकीकडे मुंबईमध्ये थंडीचा जोर वाढताना दिसत आहे. तर दुसरीकडे मुंबईकरांना प्रदूषणाची समस्या भेडसावत आहे. गेले अनेक दिवस संपूर्ण मुंबईतील हवेचा दर्जा खालावला आहे. अनेक भागांत सातत्याने 'वाईट' हवा नोंदली जात आहे. काही ठरावीक परिसर सोडल्यास मुंबईच्या सर्वच भागांत हीच परिस्थिती आहे.

भायखळा, मालाड, शिवडी, वरळी आदी भागांतील हवेचा दर्जा रविवारीदेखील वाईट श्रेणीत असल्याचे दिसून आले. परिणामी आरोग्याशी संबंधित विकार टाळण्यासाठी अनेकांनी मास्कचा वापर सुरू केल्याचे पाहायला मिळत आहे.

काय आहे उपाय?

हवेत धुळीचे प्रमाण जास्त आणि प्राणवायू कमी प्रमाणात आहे. त्यामुळे प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेने ठोस उपाययोजना हाती घ्याव्यात. मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या बांधकामांवर निर्बंध आणावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. मुंबई पालिकेकडून अँटी स्मॉग गन, वॉटर स्प्रिंकलर्ससारखे पर्याय वापरून हवेची गुणवत्ता सुधारण्यावर भर दिला जात आहे. मात्र, त्याचा फारसा उपयोग होत नसल्याने नागरिकांनी आरोग्याच्या समस्या टाळण्यासाठी मास्कचा वापर सुरू केला आहे.

रविवार नोंदवण्यात आलेली हवेची गुणवत्ता (AQI मध्ये)

भायखळा २८० वाईट

चेंबूर १५२ - मध्यम

देवनार १३९

मालाड -२३३ मध्यम

माझगाव १३८मध्यम

विलेपार्ले- १६७मध्यम

खेरवाडी - १९४ मध्यम

नेव्हीनगर- १७६मध्यम

शिवाजीनगर - १९३मध्यम

सिद्धार्थनगर (वरळी)२५३ - वाईट

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात

Jalgaon Accident : आयशर वाहनाची एसटी बसला जोरदार धडक; बसचे मोठे नुकसान, 1 जणाचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी

11th Addmission Date Extend : अकरावी प्रवेशासाठी मुदतवाढ; आता 'या' तारेखपर्यंत घेता येणार प्रवेश

AsiaCup 2025 : BCCI च्या निर्णयाने क्रिकेटविश्वात खळबळ,शुभमन गिल उपकर्णधार