mumbai air pollution 
ताज्या बातम्या

Mumbai Weather: मुंबईतील हवेचा दर्जा खालावला

मुंबईतील हवेचा दर्जा पुन्हा खालावला आहे. कुलाबा आणि कांदिवली येथे 'वाईट' श्रेणीत हवेची नोंद करण्यात आली आहे.

Published by : Team Lokshahi

थंडीची चाहूल लागताच मुंबईमध्ये हवेचा दर्जा खालावण्यास सुरूवात होते. मुंबईत मागील दोन तीन दिवस ढगाळ वातावरण पाहायला मिळाले. तसेच पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे हवेत साचलेली प्रदूषके वाहून नेण्यास मदत झाली. त्यामुळे मागील काही दिवस मुंबईच्या हवा गुणवत्तेत बऱ्यापैकी सुधारणा झाली होती. मात्र, गुरुवारी पुन्हा मुंबईतील हवेचा दर्जा खालावला आहे. कुलाबा आणि कांदिवली येथे ‘वाईट’ हवेची नोंद झाली तर इतर भागातील हवा देखील ‘मध्यम’ श्रेणीत नोंदली गेली.

थोडक्यात

  • मुंबईत मागील दोन तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण

  • मुंबईची हवा पुन्हा प्रदूषित

  • कुलाबा, कांदिवली येथे हवेची ‘वाईट’ स्थिती

संपूर्ण नोव्हेंबर महिना मुंबईकरांनी ‘वाईट’ हवा अनुभवल्यानंतर डिसेंबरच्या सुरुवातीस हवेची गुणवत्ता थोडी सुधारली होती. मात्र, मुंबईवरील फेंगल चक्रीवादळच्या प्रभाव संपुष्टात आल्यानंतर आता पुन्हा मुंबईची हवा प्रदूषित होत असल्याचे निदर्शनास येत आहे.

समीर अॅपच्या नोंदीनुसार, गुरुवारी कुलाबा येथे ‘वाईट’ हवेची नोंद झाली. येथील हवा निर्देशांक सायंकाळी पाचच्या सुमारास २२५ इतका होता. तर, कांदिवली येथील हवा निर्देशांक २५४ इतका होता. तसेच शीव, पवई, शिवाजीनगर, शिवडी या परिसरात मध्यम हवेची नोंद झाली. येथील हवा निर्देशांक अनुक्रमे १२०, १२१, १९८, १४४ इतका होता.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Golden Temple : अमृतसरमधील सुवर्ण मंदिर आरडीएक्सने उडवून देण्याची धमकी

Latest Marathi News Update live : इगतपुरीत मनसेचं 3 दिवसीय शिबीर

Donald Trump : '50 दिवसांत युद्ध थांबवा, अन्यथा...'; डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला धमकी?

Maharashtra Assembly Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाचा तिसरा आठवडा सुरू; अद्याप विरोधी पक्षनेतेपदाची निवड नाही