ताज्या बातम्या

Ajay Asher Removed From MITRA : देवेंद्र फडणवीस यांचा शिंदेंना धक्का! एकनाथ शिंदे यांच्या नजीकचे अजय आशर यांची उचलबांगडी

एकनाथ शिंदे यांच्या जवळचे अजय आशर यांना MITRA मधून काढले, फडणवीस यांचा मोठा निर्णय.

Published by : Prachi Nate

मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आणखी एक मोठा धक्का दिला आहे. ‘मित्र’ संस्थेच्या उच्चस्थरीय सल्लागार पदावरून उपमुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय अजय आशर यांची उचलबांगडी करण्यात आलेली आहे. तर २०२२ मध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे ‘मित्राच्या‘ उपाध्यक्षपदाची जबाबदारी होती.

‘मित्र’ संस्थेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नव्याने रचना केलेली आहे. ज्यात नीती आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्रात महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशनची निर्मिती केली आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले विश्वासू प्रवीण परदेशी यांना संस्थेचे सीइओ म्हणून नेमलं आहे. तर तीन उपाध्यक्ष नेमताना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सहअध्यक्ष म्हणून नेमल आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा