बॉलिवूडचा ॲक्शन हिरो Action Hero 'अजय देवगण Ajay Devgn पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्याचा बहुप्रतिक्षित ॲक्शन- कॉमेडी Action-Comedy चित्रपट 'सन ऑफ सरदार 2 SonOfSardaar2 ' या चित्रपटाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. अभिनेता अजय देवगणने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट Instagram account वर पोस्ट टाकत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
या पोस्टमध्ये अजय पुन्हा एखादा पारंपरिक पगडी पारिधान करुन सरदारच्या लूकमध्ये दिसत आहे. पोस्टच्या कॅप्शला अजय देवगण Ajay Devgn लिहितो की, ""सरदारची पुनरागमन! #SOS2 तुमच्याजवळच्या चित्रपटगृहात २५ जुलैला. #SardaarIsBack #SonOfSardaar2 @mrunalthakur @officialjiostudios @devgnfilms @tseries.official""
'सन ऑफ सरदार2 SonOfSardaar2 ' हा चित्रपट येत्या 25 जुलैला प्रदर्शित होत असून मृणाल ठाकूर Mrunal Thakur प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. अभिनेता संजय दत्त Sanjay Dutt देखील आपल्या ‘डॉन’च्या भूमिकेत पुनरागमन करणार आहे. मूळ चित्रपटातील रवि किशन Ravi Kishan यांची व्यक्तिरेखा, जी यावेळी विजय राज Vijay Raj साकारणार होते, ती आता संजय मिश्रा Sanjay Mishra साकारणार आहेत.
या चित्रपटाचे दिग्दर्शक विजय कुमार अरोरा Vijay Kumar Arora यांनी केली आहे. त्याचप्रमाणे चित्रपटाची निर्मिती जिओ स्टुडिओज Jio Studios, देवगण फिल्म्स Devgn movie आणि टी-सिरीज T-Series यांच्या संयुक्त विद्यमाने केली जात आहे. 2012 मधील ‘सन ऑफ सरदार SonOfSardaar’मध्ये अजय देवगण Ajay Devgn, संजय दत्त Sanjay Dutt आणि सोनाक्षी सिन्हा Sonakshi Sinha ही प्रमुख भूमिकेत दिसली होती. हा चित्रपट त्याच्या विनोदी शैलीसाठी आणि पंजाबी पार्श्वभूमीमुळे प्रचंड लोकप्रिय ठरला होता. यंदा मात्र 'सन ऑफ सरदार2 SonOfSardaar2 ' ला चुरशीची लढत द्यावी लागणार आहे. सिद्धार्थ मल्होत्रा Siddharth Malho आणि जान्हवी कपूर Janhvi Kapoor यांचा 'परम सुंदर' हा चित्रपट एकाचवेळी रिलीज होणार आहे.