Son Of Sardar 2 : Action-comedy सह अजय देवगणची पुन्हा जादू ! बहुचर्चित चित्रपटाच्या टीझर रिलीज  Son Of Sardar 2 : Action-comedy सह अजय देवगणची पुन्हा जादू ! बहुचर्चित चित्रपटाच्या टीझर रिलीज
ताज्या बातम्या

'Son Of Sardar 2' Teaser Release : धमाकेदार Action-comedy चा थरार! बहुचर्चित चित्रपटाच्या टीझर रिलीज

मुकुल देव यांच्या शेवटच्या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित, चाहत्यांमध्ये भावनांचा उद्रेक

Published by : Riddhi Vanne

Son Of Sardaar 2 Teaser Out Now : ज्येष्ठ अभिनेता मुकुल देव यांच्या आकस्मिक निधनाला जवळपास एक महिना झाला असतानाच, त्यांच्या शेवटच्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. 'सन ऑफ सरदार 2' Son Of Sardar 2 या बहुचर्चित सिनेमात मुकुल देव पुन्हा एकदा ‘टोनी’ या आपल्या गाजलेल्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. ढोल-ताशांच्या तालावर आनंदाने नाचणारा त्यांचा हा अवतार कदाचित पडद्यावरचा शेवटचा ठरेल. या दृश्यांनी चाहत्यांच्या भावना अधिकच तीव्र केल्या असून, आता प्रेक्षक त्यांना शेवटचं मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

'सन ऑफ सरदार 2' मध्ये अजय देवगण सरदार जस्सीच्या भूमिकेत पुन्हा एकदा धमाकेदार पुनरागमन करत आहे. 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'सन ऑफ सरदार' या सुपरहिट चित्रपटाचा हा हाय-ऑक्टेन सिक्वेल आहे. जस्सीची ही विनोदी आणि एकतर्फी प्रेमाची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली होती. पहिल्या लूकपासूनच हे स्पष्ट झाले होते की हा चित्रपट केवळ सिक्वेल नसून एक पूर्ण विकसित आणि भव्य तमाशा असणार आहे. ट्रेलर आणि पोस्टरमध्ये जस्सीचे भारदस्त व्यक्तिमत्त्व, धमाल अ‍ॅक्शन आणि चटकदार संवाद समोर येत आहेत. चित्रपटाच्या घोषणा व्हिडिओनेही प्रेक्षकांच्या उत्सुकतेला आणखी गती दिली आहे आणि एक हटके पंजाबी धम्माल रंगमंच उभा केला आहे.

विजय कुमार अरोरा दिग्दर्शित या चित्रपटात अजय देवगणसोबत रवी किशन, संजय मिश्रा, मृणाल ठाकूर, नीरू बाजवा, चंकी पांडे, कुब्रा सैत, दीपक डोब्रियाल, विंदू दारा सिंग, रोशनी वालिया, शरत सक्सेना, साहिल मेहता आणि दिवंगत मुकुल देव यांचा समावेश आहे. या तगड्या स्टारकास्टमुळे चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. 'सन ऑफ सरदार 2' ची निर्मिती जिओ स्टुडिओज, देवगण फिल्म्स, ए देवगण फिल्म्स आणि एसओएस २ लिमिटेड यांनी केली आहे. अजय देवगण आणि ज्योती देशपांडे यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून, एन. आर. पचिसिया आणि प्रवीण तलरेजा सहनिर्माते आहेत. कुमार मंगत पाठक यांनी सह-निर्मितीची जबाबदारी सांभाळली आहे. हा बहुप्रतीक्षित चित्रपट 25 जुलै 2025 रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा..

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा

Gujrat Rain Update : गुजरातमध्ये समुद्र खवळला; तीन बोटी बुडाल्या

Chhatrapati Sambhajinagar : "काळजी घ्या" मृत्यूपूर्वी वडिलांना फोन! सिलेंडरमध्ये खुपसवली कात्री अन् स्फोटादरम्यान CA विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

Monorail : मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार; MMRDAने घेतला महत्त्वाचा निर्णय