ताज्या बातम्या

Raid 2 box Office Collection : अजय देवगणच्या 'या' चित्रपटाने पहिल्याच दिवशी घातला धुमाकुळ; जाणून घ्या किती केली कमाई?

रेड2 बॉक्स ऑफिस: अजय देवगणच्या चित्रपटाची पहिल्या दिवशी 10 कोटींची कमाई, जाणून घ्या अधिक!

Published by : Team Lokshahi

अजय देवगणच्या 'रेड2' या चित्रपटाचे प्रदर्शनाच्या एक दिवस आधी आगाऊ बुकिंग केले जात होते. रेड2 चित्रपटाने पहिल्या दिवशी 10 कोटी इतकी कमाई केली आहे. वाढता बुकिंगचा वेग पाहता हा चित्रपट 13-15 कोटी रुपयांच्या दरम्यान ओपनिंग करु शकेल असा अंदाज होता. पण गुरुवारी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ज्या पद्धतीने कामगिरी केली ती अपेक्षेपेक्षा खूपच जास्त आहे.

अजयच्या चित्रपटासाठी 2 लाख 20 हजारांहून अधिक तिकिटांची आगाऊ बुक करण्यात आली होती. या जोरदार बुकिंगमुळे चित्रपटाने 6.5 कोटी रुपयांपेक्षा जास्त आगाऊ कमाई केली होती. अशा परिस्थितीत 'रेड-2' ची निव्वळ ओपनिंग सुमारे 15 कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकते असे मानले जात होते.

'रेड2' या वर्षीचा तिसरा सर्वात मोठा बॉलिवूड ओपनिंग चित्रपट ठरला आहे. त्याच्या पुढे विकी कौशलचा 'छावा' चित्रपटाने 33 कोटी तर सलमान खानच्या 'सिकंदर'ने 27.5 कोटींचा गल्ला जमा केला.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा