थोडक्यात
एमसीए अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट
अजिंक्य नाईक यांच्या उमेदवारीला नव्याने आव्हान
एमसीएच्या अध्यक्षपदावरुन उमेदवारीला आव्हान
आव्हान देणाऱ्या याचिकेवर तातडीची सुनावणी
(Ajinkya Naik MCA President Big Update) एमसीएच्या अध्यक्षपदाचे एकमेव दावेदार अजिंक्य नाईक यांच्या उमेदवारीला नव्याने आव्हान समोर आले आहे. अजिंक्य नाईक यांच्या उमेदवारीवर आव्हान देणाऱ्या याचिकेवर तातडीची सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाची मान्यता देण्यासाठी उद्या तातडीची सुनावणी होणार आहे. न्या रियाज छागला आणि न्या फरहान दुभाष यांच्या खंडपीठासमोर होणार सुनावणी. एमसीएचे सभासद असलेल्या समीर पेठे यांनी दिलय अजिंक्य नाईक यांच्या उमेदवारीवर अर्ज करणार आहे.
अजिंक्य नाईक यांनी २०१९ पासून सलग दोन एमसीएच्या एपेक्स कौन्सिल मधील कार्यकाळ पूर्ण केला असून एमसीएच्या नियमानुसार त्यांना कुलिंग ऑफ कालावधी गरजेचा असल्याने अध्यक्षपदासाठीची त्यांची उमेदवारी अपात्र ठरवण्याची मागणी देण्यात आली आहे. सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अजिंक्य नाईक यांच्या व्यतिरिक्त सगळ्यांनी अर्ज मागे घेतल्याने अजिंक्य नाईक यांचा विजय निश्चित आहे.