ताज्या बातम्या

Ajit Pawar : आम्ही तुमच्या पाठीशी, बारामतीप्रमाणेच साताऱ्याचा विकास करणार : अजित पवार

अजित पवार: साताऱ्याच्या विकासासाठी वचनबद्ध, शेतकरी मेळाव्यात भाषण

Published by : Team Lokshahi

सातारा जिल्ह्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात स्थानिक नागरिक व शेतकरी बांधवांनी आपुलकीने सत्कार केले. यावेळी इतर मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला. अजित पवारांनी आपलं मनोगत व्यक्त केले. उपस्थित नागरिकांना आणि शेतकरी बांधवांना संबोधित केलं. "सध्या देशात व राज्यात अनेक समस्या आहेत. मात्र तुमचं-आमचं हक्काचं सरकार त्या अडचणी दूर करण्यासाठी सक्षम आहे," असे त्यांनी ठामपणे सांगितले.

ते पुढे अजित पवार म्हणाले की, "शेतीच्या पाण्याचा प्रश्न असो, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असो, आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत. सातारा जिल्ह्याचाही बारामतीप्रमाणे सर्वांगीण विकास करणारच." यावेळी त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयात मिळालेली गती, सैनिकी शाळेमधील रखडलेली कामे मार्गी लावणं, कोयना नगर मधील स्कायवॉक व नेहरू उद्यानाच्या सुशोभीकरणाबाबत केलेली कामगिरी त्यांनी आढावा घेतला. अर्थसंकल्पात सादर करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजना, ३, ५ व ७.५ एचपी पर्यंतच्या शेती पंपधारक शेतकऱ्यांसाठी मोफत वीज योजनेसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे.

देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री मा. नितीनजी गडकरी यांच्या सहकार्याने राष्ट्रीय महामार्ग, नवीन रेल्वे मार्गिका, फलटण ते बारामती मार्ग आणि मेट्रो प्रकल्प जलद गतीने राबवले जात असल्याची माहिती त्यांनी दिली. "गुंतवणूक वाढावी व रोजगारनिर्मिती व्हावी यासाठी राज्यात विमानतळांची आवश्यकता आहे. उद्योग, शेती, शिक्षण, आरोग्य –कुठल्याही क्षेत्रांत गरज भासल्यास राज्य सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील," असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केलं. कार्यक्रमाची सांगता करताना त्यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज ,छत्रपती शाहू महाराज , महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जनकल्याणासाठी सदैव कटिबद्ध आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Pune : पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नवे नाव राजगड; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा ऐतिहासिक निर्णय

Latest Marathi News Update live : राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला?

Rain Update : आजपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान विभागाने वर्तवला अंदाज

Pune Metro : पुणे मेट्रोच्या स्वारगेट–कात्रज मार्गावर दोन नवीन स्थानकांना मंजुरी