Congress : काँग्रेसला मोठा धक्का! आणखीन एक बडा नेता महायुतीच्या वाटेवर, 20 हजार कार्यकर्त्यांसह होणार पक्षप्रवेश Congress : काँग्रेसला मोठा धक्का! आणखीन एक बडा नेता महायुतीच्या वाटेवर, 20 हजार कार्यकर्त्यांसह होणार पक्षप्रवेश
ताज्या बातम्या

Congress : काँग्रेसला मोठा धक्का! आणखीन एक बडा नेता महायुतीच्या वाटेवर, 20 हजार कार्यकर्त्यांसह होणार पक्षप्रवेश

विधानसभा निवडणुकीनंतर राज्याच्या राजकीय पटावर मोठ्या हालचाली सुरू असून, महाविकास आघाडीला एकामागोमाग एक धक्के बसत आहेत. अनेक दिग्गज नेते आघाडीची साथ सोडत महायुतीकडे वळत आहेत.

Published by : Riddhi Vanne

Congress Big Leader Will Join Ncp : विधानसभा निवडणुकीनंतर राज्याच्या राजकीय पटावर मोठ्या हालचाली सुरू असून, महाविकास आघाडीला एकामागोमाग एक धक्के बसत आहेत. अनेक दिग्गज नेते आघाडीची साथ सोडत महायुतीकडे वळत आहेत. सध्या शिवसेना शिंदे गट, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यामध्ये मोठ्या प्रमाणावर नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा प्रवेश सुरू आहे. दरम्यान कॉंग्रेससाठी आणखी एक धक्का बसणार आहे. प्रदेश उपाध्यक्ष प्रतिभा शिंदेंनी दोन दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. आता त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याचं त्यांनी अधिकृतपणे जाहीर केलं आहे.

प्रतिभा शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या 20 ते 25 हजार कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. हा भव्य प्रवेश सोहळा 17 ऑगस्ट रोजी जळगावमधील शिवतीर्थ मैदानावर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.

या निर्णयामागील कारणे स्पष्ट करताना शिंदे म्हणाल्या, “ज्या आशा आणि अपेक्षा घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता, त्याला अपेक्षित असा सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. जळगाव जिल्ह्यातील बैठकींसाठी मला बोलावलं जात नव्हतं. पद असूनही काम करण्याची संधी दिली जात नव्हती. त्यामुळे जिल्हा नव्हे, तर राज्य पातळीवरही नाराजी वाढली होती.”

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Pune Metro : पुणे मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ; 15 ऑगस्टपासून नवीन वेळापत्रक लागू होणार

Arjun Tendulkar Engagement : अर्जुन तेंडुलकरने गुपचूप उरकला साखरपुडा?

Eknath Shinde - Aaditya Thackeray : एकनाथ शिंदे - आदित्य ठाकरे आज एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता; कारण काय?

Maharashtra Weather Update : पुढील तीन ते चार दिवस राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार