(Ajit Pawar Death in Plane Crash) अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. आज सकाळी बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघातामध्ये अजित पवारांसह 6 जणांचा मृत्यू झाला. या अपघाताचे भयावह फोटो, व्हिडिओ समोर आले असून विमान उतरत असताना एका शेतात कोसळल्याचे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.
अपघात इतका भीषण होता की संपूर्ण विमान जळून खाक झाले. या घटनेनंतर महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.यातच आता या विमान अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे.
अजित पवार यांच्या विमानाच्या अपघात हा 8.46 मिनिटांनी झाल्याची माहिती मिळत असून ही दृश्य खूप भीषण असल्याचे पाहायला मिळत आहे. विमान हे आकाशात घिरट्या घालून लँडिंग करताना हा स्फोट झाल्याचे पाहायला मिळत आहे.