Ajit Pawar Death Dhananjay Munde breaks down after Ajit Pawar passes away in plane crash 
ताज्या बातम्या

Ajit Pawar Death : "आज पुन्हा पोरका झालो..." 'त्या' नेत्याने पोस्ट टाकत व्यक्त केला भावना

"आज पुन्हा पोरका झालो... माझे दादा मला पोरका करून गेले... माझे वडील गेल्यानंतर दादांनी मला वडील नसल्याचे कधी जाणवू दिले नाही."

Published by : Riddhi Vanne

Dhananjay Munde On Ajit Pawar Death News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेतील निधनाच्या बातमीने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. त्यांच्या जाण्याने राजकारणातच नव्हे तर सर्वसामान्य जनतेतही तीव्र शोक व्यक्त केला जात आहे. या दुःखद घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे भावुक झाले. त्यांनी एक्स पोस्ट टाकत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केली.

एक्स पोस्टमध्ये धनंजय मुंडे लिहितात की, आज पुन्हा पोरका झालो... माझे दादा मला पोरका करून गेले... माझे वडील गेल्यानंतर दादांनी मला वडील नसल्याचे कधी जाणवू दिले नाही. माझं आणि दादांचं नातं शब्दात सांगू शकत नाही. संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासाचे स्वप्न उराशी घेऊन झोपणार आणि भल्या पहाटे ती स्वप्नं पूर्ण करण्यासाठी कामाला लागणारा नेता; वेळेचे नियोजन, शिस्त यातून विकासाचा दरारा महाराष्ट्रात उभा करणारे दादा आज महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला स्तब्ध करून आणि आम्हा सर्वांना दुःखाच्या छायेत सोडून निघून गेले... दादांचे अकाली निधन ही घटनाच मुळात हृदयाला न पटणारी आहे. आमचे राजकीय अस्तित्व दादांच्या जीवावर होते... त्यामुळे अजूनही असं वाटतंय की आत्ता दादांचा फोन येईल आणि म्हणतील, धनंजय वेळेवर ये बरका... त्यामुळे श्रद्धांजली हा शब्दच फुटत नाहीये... देशाची, राज्याची, पक्षाची, माझ्या बीड जिल्ह्याची आणि माझी कधीही न भरून निघणारी हानी...

या दुःखद घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे भावुक झाले. “माझ्या आयुष्यातील मोठा आधार गेला,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना मांडल्या. वडिलांनंतर अजित पवार यांनी कायम मार्गदर्शन केले, असे सांगताना त्यांचा आवाज गहिवरून गेला. बातमी कळताच ते तातडीने बारामतीकडे रवाना झाले.

अजित पवार आणि धनंजय मुंडे यांचे नाते केवळ राजकीय नव्हते, तर विश्वासाचे आणि आपुलकीचे होते. दादांनी नेहमीच मुंडेंच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून त्यांना बळ दिले. या घटनेने विरोधी पक्षातील नेतेही हळहळले आहेत. अनेकांनी अजित पवार यांना सामान्य माणसांशी जोडलेला, निर्णयक्षम आणि कष्टकऱ्यांचा आवाज असलेला नेता म्हणून श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्राने एक प्रभावी नेतृत्व गमावल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा