Ajit Pawar 
ताज्या बातम्या

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापनदिनी उपमुख्यमंत्री अजित पवार झाले भावुक, म्हणाले;"शरद पवार साहेबांनी..."

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापनदिनी पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार शरद पवारांच्या आठवणींना उजाळा देताना भावुक झाले.

Published by : Naresh Shende

Ajit Pawar On Sharad Pawar : काळ वेळ कुणासाठी थांबत नसतो. बघता बघता २५ वर्षे झाली. त्या आठवणींना उजाळा देण्याचं काम सुनील तटकरे, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल आणि इतर मान्यवरांनी केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापन होत असतना छगन भुजबळ पायाला भिंगरी बांधून महाराष्ट्रात फिरत होते. तेव्हा भाजप-शिवसेनेचं सरकार होतं. पण भुजबळ साहेबांनी राष्ट्रवादीसाठी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. आज २५ वर्ष पूर्ण होत असताना काँग्रेस-राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते आपल्यासोबत नाही आहेत. याचीही खंत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून २४ वर्ष पक्षाचं नेतृत्व करणाऱ्या पवार साहेबांनी देखील समर्थ नेतृत्त्वाबद्दल पक्षाच्या वतीनं त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो, असं विधान पवार यांनी शरद पवारांच्या आठवणींना उजाळा देताना केलं.

अजित पवार पुढे म्हणाले, वेगवेगळ्या पद्धतीच्या घटना घडत असतात. इथून पुढच्या काळाता नव्या उमेदीनं आपल्याला पुढील काळात काम करायचं आहे. २५ वर्षापूर्वी सोनिया गांधींच्या विदेशी असण्याच्या मुद्द्यावरून काँग्रेस पक्षाची फारकत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. त्यावेळी मला वाटत होतं, ज्या पद्धतीनं हा महाराष्ट्र पिंजून काढण्याचं काम भुजबळ साहेबांनी प्रांताध्यक्ष म्हणून केलं. यामध्ये इतर मान्यवरांचंही योगदान आहे. त्यावेळी महाराष्ट्रात काँग्रेसला नेतृत्व नसतानाही काँग्रेसच्या ७५ जागा आल्या.

आपल्या फक्त ५८ जागा आल्या. आपल्याला वेळही कमी मिळाला होता. आपल्याला आणखी वेळ मिळाला असता आणि नियमित निवडणुका झाल्या असत्या तर वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. पण झालं गेलं ते गंगेला मिळालं. महाराष्ट्र, बिहार, गोवा, अरुणाचल प्रदेश, मेघालय अशा अनेक राज्यात पक्षाचा विस्तार झाला. काही ठिकाणी आपल्या पक्षाचे उपमुख्यमंत्री, मंत्री आणि आमदारही झाले. पक्ष सर्वदूर पोहोचवण्याचं काम झालं, असंही अजित पवार म्हणाले.

काय म्हणाले छगन भुजबळ?

उत्तर प्रदेशात जागा कमी होतील, असं कुणाला वाटलं होतं का? पण जागा एकदम खाली आल्या आणि तिथे इंडिया आघाडी पुढे गेली. इंडिया आघाडी यांच्यात दिशाभ्रम करण्यात यशस्वी झाले आहेत. आपण छत्रपती, शाहू-फुले आंबेडकरांचं नाव घेतो. आपणही त्याच मार्गाने जातो. ते आपल्याला कृतीतून दाखवावं लागणार आहे. जनतेला तसा विश्वास दाखवावा लागेल की, आम्ही याच मार्गाने जाणार आहोत. सर्व धर्माची, जातीची मतं आपल्यासा सोबत घ्यावी लागतील, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी केलं आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापनदिन सोहळ्यात कार्यकर्त्यांना संबोधीत करताना बोलत होते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Uddhav Thackeray On Meenatai Statue : "हे करणारे दोनचं व्यक्ती असू शकतात" मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकण्याचा प्रकार, उद्धव ठाकरेंचा निशाणा कोणाकडे?

Uddhav Thackeray On Narendra Modi : “मोदी हे आपले शत्रू नाहीत, पण ते..." पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत उद्धव ठाकरेंनी केलं मोठ वक्तव्य

iPhone17 मार्केटमध्ये लॉन्च ; जाणून घ्या 'ही' वैशिष्ट्य

Hollywood Star Robert Redford : मोठी बातमी! हॉलिवूडचा ‘गोल्डनबॉय’ रॉबर्ट रेडफोर्ड यांचे निधन