थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Ajit Pawar) अजित पवार पोलिसांसह कार्यकर्त्यांवर चिडल्याचे पाहायला मिळत आहे. जालन्यामध्ये व्यासपीठावरील पाठीमागच्या लाईनमध्ये बसलेले निवडणुकीतील उमेदवार उपस्थित लोकांना दिसत नसल्याने अजित पवारांनी व्यासपीठाच्या खालच्या बाजूला पुढे कार्यकर्त्यांना खुर्च्या ठेवायला सांगितल्या.
व्यासपीठापुढे खुर्च्या टाकून उमेदवारांना खुर्च्यांवर बसायला सांगितलं. मात्र यासाठी आधी पोलीस खुर्च्या टाकायला परवानगी देत नव्हते. मात्र नंतर अजित पवार यांनी मी तुम्हाला सांगतो असं पोलिसांना सांगत निवडणुकीतील उमेदवारांना व्यासपीठाच्या पुढे बसायला सांगितले. त्यामुळे सर्व उमेदवार व्यासपीठाच्या समोर खुर्च्या ठेऊन बसल्याचे पाहायला मिळाले.
Summery
अजित पवार पोलिसांसह कार्यकर्त्यांवर चिडले
पाठीमागच्या लाईनमध्ये बसलेले निवडणुकीतील उमेदवार उपस्थित लोकांना दिसत नव्हते
त्यामुळे अजित पवारांनी व्यासपीठापुढे खुर्च्या टाकून उमेदवारांना बसायला सांगितलं