पिपंळी येथील ग्रामसचिवालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते झाले. विकास कामाच्या दर्जावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेकदा ठेकेदार,अधिकाऱ्यांनी धारेवर धरले आहे. कामाच्या दर्जावरुन त्यांनी ठेकेदारांना खडेबोल सुनावले आहे.
यातील अनेक ठेकेदार हे राजकीय पदाधिकारी किंवा नेत्यांच्या नातेवाईक असतात. सरकारी कामाचा ठेका मिळवण्यासाठी सत्ताधारी पक्षाची वाट धरणारे अनेक कार्यकर्ते असतात.अशा व्यक्ती ज्यांना राजकारणात येऊन ठेकेदार व्हायचं असतं त्यांची कानउघाडणी अजित पवारांनी केली आहे.