ताज्या बातम्या

Pahalgam Terror Attack : 'राज्य सरकार तुमच्या दुःखात सहभागी'; अजित पवार यांनी दिला जगदाळे, गणबोटे कुटुंबियांना धीर

अजित पवार यांनी घेतली जगदाळे आणि गणबोटे कुटुंबियांची सांत्वनपर भेट

Published by : Team Lokshahi

जम्मू कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील पर्यटक संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेनंतर, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी काल, २५ एप्रिल २०२५ रोजी पुण्यातील जगदाळे व गणबोटे कुटुंबीयांची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, "राज्य शासन आपल्या दुःखात सहभागी असून, शासन तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे." त्यांनी पीडित कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही दिली.

तसेच, उपमुख्यमंत्री पवार यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात काल बोलताना या हल्ल्याचा तीव्र निषेध करताना म्हणाले की, "या भ्याड हल्ल्यात निष्पाप पर्यटकांचा बळी गेला आहे. संपूर्ण देशात या घटनेचा तीव्र निषेध होत असून, अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कठोर कारवाई केली जाईल. भारतीय लष्कर या हल्ल्याच्या जबाबदारांवर कठोर कारवाई करेल आणि या हल्ल्याचा बदला घेतला जाईल याबाबत मला पूर्ण विश्वास आहे."

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

IND vs PAK: दुबईत भारताची कामगिरी फिक्की, किती सामने जिंकलेत?, जाणून घ्या...

Sahitya Sangh Mandir : गिरगावचे साहित्य संघ राजकारणाच्या भोवऱ्यात?

Latest Marathi News Update live : मुंबईसह ठाण्यात आज मुसळधार पावसाचा अंदाज…

Weather News : मुंबईत काळ्या ढगांची गर्दी; पुढील तासांत मुसळधार पावसाची शक्यता