राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना विविध मुद्यांवर चर्चा केली. यावेळी त्यांनी राज्यातील 14 लाख विद्यार्थ्यांची सरकार करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. त्याचप्रमाणे 3 मार्चपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच या अर्थसंकल्पामधून सर्व घटकांना न्याय देणार असल्याचेही ते म्हणाले.
याबद्दल बोलताना ते म्हणाले की, "राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्च पासून सुरु होणार आहे. यादरम्यान पुरवणी मागण्या मांडल्या जाणार आहेत. त्याचप्रमाणे 10 तारखेला अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने ज्या प्रकारे अर्थसंकल्पामधून सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला त्याचप्रमाणे राज्य सरकारदेखील प्रयत्न करणार आहे".
याचवेळी त्यांना कालवा समिती बैठकीबद्दलही प्रश्न विचारले गेले. त्यावर अजित पवार म्हणाले की, "हे आमचं दरवर्षीचं काम आहे. उन्हाळ्यामध्ये आपण पावसाचा अंदाज घेतो. त्यानुसार आपण राज्याला पाणी वाटप करतो. त्यामुळे हे काम काही नवीन नाही. हे नियोजन आम्ही करणार आहोत. मीदेखील त्या मीटिंगला असणार आहे".