राष्ट्रवादी काँग्रेसला 24 वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी करण्यात आली आहे. या निमित्ताने निमित्ताने राष्ट्रवादीने केडगाव, अहमदनगर येथे महामेळाव्याचं आयोजन केलं आहे.
राष्ट्रवादीच्या पुण्यातील बैठकीला अजित पवार उपस्थित राहून कार्यक्रमाचा आढावा घेत होते. यावेळी अजित पवार कार्यकर्त्यांवर भडकले. अजित पवार म्हणाले की, हा कोणता फाजिलपणा चाललाय? पदाचा राजीनामा घेईल हां. मी टोकाचा वागेन मग. भांडायचं नाही. नाही तर एकएकाच्या कानाखालीच आवाज काढेनं. यातून तुमची बदनामी होत नाही. बदनामी आमची होते. पवार साहेबांची होते. असे अजित पवार म्हणाले.