ताज्या बातम्या

2 हजाराची नोट बंद करण्याचा फतवा - अजित पवार

Published by : Siddhi Naringrekar

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2 हजार रुपयांच्या नोटेवर मोठा निर्णय घेतला आहे. 2 हजार रुपयांच्या नोटा चलनातून काढणार आहे. मात्र, ती कायदेशीर निविदा राहील. आरबीआयने बँकांना 2 हजार रुपयांच्या नोटा देणे तात्काळ बंद करण्याच्या सल्ला दिला आहे. रिझर्व्ह बँकेने 'क्लीन नोट पॉलिसी' अंतर्गत हा निर्णय घेतला आहे. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत 2 हजारांच्या नोटा बँकेतून बदलून घेता येतील.

याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार म्हणाले की, 2 हजाराची नोट बंद करण्याचा फतवा आहे. सारख सारखे निर्णय बदलले जातात. मागच्यावेळी जेव्हा असे केले तेव्हा लोकांनी खूप सहन केलं. 3 महिन्यांमध्ये लोकांना इतका काही त्रास होईल वाटत नाही. मात्र 2000 हजारची नोट बंद करण्याचे कारण काय? हे आरबीआयने व केंद्राकडून समजले तर देशाच्या भल्याकरता ज्या गोष्टी करणं गरजेचे आहे. ते करण्याकरता भारतातील जनतेने विरोध केलेला मी पाहिलेला नाही.

...म्हणून मी पहाटे पोलीस ठाण्यात गेलो होतो; सुनील टिंगरे यांचे स्पष्टीकरण

Rahul Narwekar : 'यामिनी जाधव यांना खरंच मदत झाली का?' काय म्हणाले राहुल नार्वेकर

Lok Sabha Election 2024: एकाच तरुणानं केलं चक्क 8 वेळा मतदान; व्हिडीओ व्हायरल...

माजी नगरसेवकांचे अनोखे आंदोलन, नागरिकांच्या पाणी प्रश्नासाठी केले अनोखे आंदोलन

Daily Horoscope 22 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांचे उत्पन्नाचे नवे मार्ग उघडणार; पाहा तुमचे भविष्य