ताज्या बातम्या

धनुष्यबाण मिळाल्यानंतर शिंदे गटात जल्लोष; मात्र अजित पवार म्हणाले...

Published by : Siddhi Naringrekar

निवडणूक आयोगामध्ये एकनाथ शिंदे यांना विजय झाला आहे. धनुष्यबाण निशाणी व शिवसेना हे नाव बाळासाहेबांच्या शिवसेनेला म्हणजेच शिंदे गटाला मिळाले आहे. निवडणूक आयोगाचा हा निकाल उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जात आहे.

शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? यावर शिंदे-ठाकरे गटात जोरदार रस्सीखेच सुरु आहे. 17 जानेवारी रोजी निवडणूक आयोगासमोर ठाकरे गटाकडून युक्तिवाद झाल्यानंतर शिंदे गटाने ठाकरे गटाचे दावे फेटाळून लावले होते. यावेळी 23 जानेवारीला दोन्ही गटांना लेखी स्वरुपात उत्तर देण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिला होते. यानंतर आज निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला धक्का देत धनुष्यबाण व शिवसेना हे नाव शिंदे गटाला दिले आहे.

याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे की, केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेला निकाल हा अनपेक्षित आहे. सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे की 21 फेब्रुवारीपासून दोघांचं म्हणणं ऐकून घेऊन काय असेल तो निर्णय देतील. असं असताना एवढी घाई का केली? हे कळायला मार्ग नाही. तसेच निवडणूक आयोगाने निकाल दिलेला असला, तरी माझं असणं म्हणणं आहे की उद्धव ठाकरे वरच्या कोर्टात जातील आणि त्यांच्याकडे न्याय मागतील. महाराष्ट्रात जेव्हा निवडणूका लागतील तेव्हा शिवसैनिक हे उद्धव ठाकरे यांच्या बाजूनेच उभे राहतील आणि त्यांच्या विचाराच्या उमेदवारांना निवडून देतील. असे अजित पवार म्हणाले.

Navi Mumbai : नवी मुंबईत अनधिकृत होर्डिंगवर पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई

Monsoon News : केरळमध्ये 31 मे ला मान्सून दाखल होणार,हवामान विभागाचा अंदाज

Amit Shah On Kejriwal : 'केजरीवालांना जामिनाबाबत विशेष वागणूक' अमित शाहांचा मोठा दावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोवर संजय राऊत यांची टीका; म्हणाले...

नाशिकमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या सभेत घोषणाबाजी; रोहित पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...