ताज्या बातम्या

रोहित पवारांच्या आरोपावर अजित पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

रोहित पवार यांनी एक व्हिडिओ ट्विट करत अजित पवार गटावर टीका केली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

रोहित पवार यांनी एक व्हिडिओ ट्विट करत अजित पवार गटावर टीका केली आहे. रोहित पवार ट्विट करत म्हणाले की, बारामती मतदारसंघात चक्क पोलिस ‘बंदोबस्तात’ पडतोय पैशांचा पाऊस...यासंदर्भात भोर तालुक्यातील काही व्हिडिओ शेअर करतोय… यामध्ये भोर तालुक्यातील 'अजितदादा मित्रमंडळा'चा पदाधिकारी आणि मावळमधील एका नेत्याचे कार्यकर्तेही दिसतायेत… यासाठीच पाहीजे होती का 'Y' दर्जाची सुरक्षा? असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

याच पार्श्वभूमीवर आता अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार म्हणाले की, हे काम निवडणूक आयोगाचे आहे. त्यासंदर्भामध्ये आजपर्यंत ७ विधानसभा आणि 1 लोकसभेची निवडणूक मी स्वत: लढवलेली आहे. मी असले प्रकार कधी करत नाही. कारण नसताना धादांत पहिल्यापासून या विरोधकांमधलं काही बगलबच्चे अशाचप्रकारचे आरोप करत होते पण आम्ही त्याला फार महत्व देत नाही. ते आमच्यावर आरोप करतायत, मी उद्या आरोप करु शकतो की, त्यांनी अतिशय चुकीच्या पद्धतीने या निवडणुकीची हाताळणी केली.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, तो व्हिडिओ कालचा त्या वेळेचाच होता का? समोर जो आरोप करतो ना त्याच्यावर थोडासा काहीतरी परिणाम झालेला आहे. त्या आरोपाला काही माझ्यादृष्टीने महत्व द्यावं असं वाटत नाही. त्याच्या प्रश्नाला उत्तर देण्याच्या देखील मला काही गरज वाटत नाही. असे अजित पवार म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मामा राजवाडेंचा भाजप पक्षप्रवेश थांबवला

Ashadhi Wari 2025 : वारीसाठी ST महामंडळाचे विशेष नियोजन; बीडमार्गे पंढरपूरकडे 800 विशेष बसेस

Rapido Bike : रॅपिडो बाईकला खुद्द परिवहन मंत्र्यांनी पकडले; परिवहन विभागाकडून मंत्र्यांना खोटी माहिती

Sonu Sood : "तुम्ही नंबर पाठवा..."; लातूरमधील 'त्या' शेतकरी कुटुंबाला सोनू सूदचा मदतीचा हात