उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. बारामतीतील विविध विकास कामांची पाहणी अजित पवारांनी केली. यावेळी बारामतीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला अजित पवारांनी भेट दिली. बाह्य रुग्ण (अपघात) विभागाचे उद्घाटन केलं. यावेळी अजित पवारांनी महाविद्यालयातील वरिष्ठांचा समाचार घेतला.
ते म्हणाले की, आजपर्यंत डीन तुम्ही एकालाही मेमो दिला नाही. जर तुम्ही कुणालाही मेमो दिला नाही तर कुणीही कसेही काम करेल. तुम्ही उदारमतवादी आहात अस म्हणत अजित पवारांनी कान टोचले. वैद्यकीय महाविद्यालयात कर्मचारी गैरहजर राहण्याचे प्रमाण जास्त आहे अशा तक्रारी आहेत. त्यामुळे डीन यांनी बायोमेट्रिक करण्यास सुरुवात केली पाहिजे म्हणजे शिपायांपासून सगळे बायोमेट्रिक करतील अशा शब्दांत अजित पवारांनी कान टोचले आहेत.