ताज्या बातम्या

Ajit Pawar : 'बारामतीत आत्तापर्यंत मी जेवढ काम केलं तेवढं कुणी केलं नाही'; पवारांचा टोला कुणाला?

'चुका पोटात घालून आता पोट फुटायला लागलं', असा घणाघातही त्यांनी केला.

Published by : Rashmi Mane

राष्ट्रवादी आमदार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी बारामती येथे झालेल्या कार्यक्रमात दिव्यांगांना मोफत सायकल वाटप केली. यावेळी आपल्या भाषणात अजित पवार यांनी शरद पवारांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला. "बारामतीत केलं तेवढं काम करणारा एकही आमदार मिळणार नाही," असं अजित पवार म्हणाले. 'चुका पोटात घालून आता पोट फुटायला लागलं', असा घणाघातही त्यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, "मला काही लोकांचा फोन येतो की, दादा पोटात घ्या पोटात घ्या, अरे काय पोटात घ्या, पोट फुटायला लागलं. ज्यांनी फोन केला त्यांना शरम कशी वाटत नाही, असं सांगायला. बारामतीत विकास कामे करतो आहे. पण काही जणं वेडेवाकडेपणा करतात. बारामतीत मी जेवढा आत्तापर्यंत काम केलं तेवढं काम करणारा एकही आमदार तुम्हाला इथून पुढे मिळणार नाही. 1952 पासून आतापर्यंत जे आमदार झाले त्यांनी काय कामे केलं ते पाहा.. आणि मी केलेलं काम पाहा.. अजूनही काम करणार," असं पवारांनी नमूद केलं.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Mahadev Munde Case : 'दोषींना कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही'; अशी मुख्यमंत्र्यांनी ग्वाही दिल्याचे ज्ञानेश्वरी मुंडे यांची माहिती

Latest Marathi News Update live : मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

Rakshabandhan 2025 : महागाई वाढली, पण रक्षाबंधनाचा उत्साह तसाच!

Ghashiram Kotwal : 'घाशीराम कोतवाल' हिंदी रंगभूमीवर; ज्येष्ठ हिंदी अभिनेते संजय मिश्रा साकारणार मध्यवर्ती भूमिका