उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामती दौऱ्यावरती होते. यावेळी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या अनुषंगाने कसबा येथे कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला यावेळी अजित पवार बोलत होते. त्यावेळेस वैष्णवी हगवणे प्रकरणावर बोलताना, अजित पवार माध्यमांवर संतापले,एखाद्याच्या लग्नाला गेलो त्यांनी माझासोबत काढला. त्यात माझी काय चूक? मग असं असताना माझी बदनामी विनाकारण का होतेय? असं म्हणत अजित पवारांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे.
पुढे अजित पवार म्हटले की, "वैष्णवीची नणंद, सासू, नवरा पोलिसांच्या ताब्यात आले आहे. सासरा फरार आहे, पळून पळून जाणार कुठे आहे? मुसक्या आवळून त्याला पकडून आणा. त्याची आजपासून माझ्या पक्षातून हकालपट्टी करतो, असा पुनरुच्चार त्यांनी केला. या प्रकरणात आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या सूचना देखील पोलिसांना दिल्याचं अजित पवारांनी सांगितलं."