ताज्या बातम्या

Nawab Malik यांच्यासाठी Ajit Pawar मैदानात, शिवाजीनगर मानखुर्दमध्ये महायुतीचा नेमका उमेदवार कोण?

अजित पवार नवाब मलिक यांच्या प्रचारासाठी मैदानात, महायुतीचा उमेदवार कोण? अस सवाल उपस्थित झालाय.

Published by : shweta walge

अजित पवार यांनी भाजपच्या दबावाला न जुमानता नवाब मलिक यांनी उमेदवारी दिली होती. त्यानंतर अजित पवार नवाब मलिक यांचा प्रचार करणार का? असा प्रश्न उपस्थित झाला होता. दरम्यान, अजित पवार नवाब मलिक आणि सना मलिक यांच्या प्रचारासाठी आज अणुशक्तीनगर येथे दाखल झाले. त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी बघायला मिळाली.

सना मलिक आणि नबाव मलिक यांच्यासाठी अजित पवार मैदानात उतरल्याचं पाहायला मिळालं. आरोप करणं वेगळं आणि ते सिद्ध होणं वेगळं असं म्हणत अजित पवारांनी मलिकांसोबतच असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट केलंय. दादांच्या या भूमिकेमुळे महायुतीत बिघाडीची होण्याची शक्यताय. एवढंच नव्हे तर मलिकच जिंकतील असंही दादांनी म्हटलंय. यामुळे महायुतीचे उमेदवार सुरेश पाटील की नवाब मलिक? अस सवाल उपस्थित झालाय.

दरम्यान, अजित पवार यांनी राष्ट्रवादीची अधिकृत उमेदवारी नवाब मलिक यांना देऊ नये यासाठी भारतीय जनता पक्षाने प्रचंड दबाव आणला होता. मलिक यांच्यावर गंभीर आरोप असल्याने त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवू नये, आमचा त्यांना विरोध असेल, अशी भूमिका भाजपने जाहीर केलेली होती.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा