पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पाहणी दौरा पार पडाल. त्यांनी पुण्यातील नव्याने उभारण्यात आलेल्या तानपुरा पुलाची पाहणी केली. तसेच छत्रपती संभाजी उद्यान मेट्रो स्थानकाला जोडणाऱ्या या पुलाची पाहणी केल्यानंतर अजित पवार पिंपरी चिंचवडला रवाना झाले. उपमुख्यमंत्री अजित दादा यांच्या पिंपरी चिंचवडमध्ये महानगर पालिका आयुक्त, पीएमआरडीए आयुक्त त्याच बरोबर अधिकारी यांच्यासोबत पाहणी दौरा केला.
यावेळी त्यांनी पिंपरी-चिंचवडमधील अनेक शहरांमध्ये पाहणी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार सकाळपासूनच सक्रिय होते. त्यांनी पिंपळे सौदागरच्या रखडलेल्या रस्त्यांची पाहणी केली. त्याचसोबत समृद्धी पार्क सोसायटीजवळच्या मिलिटरी रोडची पाहणी केली. तसेच रखडलेल्या रस्त्याचं काम तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
दरम्यान अजित पवारांनी अतिक्रमण काढा , फुटपाथ वरील वाहनेही काढा, आमची वाहनं असले तरी काढा हे सगळ काम आजच झालं पाहिजे, अशी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांना तंबी दिली. तसेच यावेळी अजित पवारांनी आज पत्रकारांशी देखील संवाद साधला. अजित पवारांनी त्यांच्या मिश्किल स्वभावाला जागत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर दिली.