Ajit Pawar 
ताज्या बातम्या

अजित पवारांकडे अर्थ खातं? राष्ट्रवादीला किती कॅबिनेट आणि राज्यमंत्रिपदं मिळणार?

राष्ट्रवादी काँग्रेसला केंद्रात मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला एकूण किती कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपदं मिळतील याकडे सगळ्याचं लक्ष वेधलं आहे.

Published by : Team Lokshahi

मुख्यमंत्री पदाचा पेच दिल्लीत अमित शहांसोबत बैठकीत सुटला आहे. पण खाते वाटपासंदर्भात अद्याप अंतिम निर्णय झाला नाही. गुरूवारी उशिरा झालेल्या बैठकीसाठी मुंबईहून अजित पवार हे सर्वात पहिले दिल्लीसाठी रवाना झाले होते. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतून प्रमुख नेते हे आदल्याच दिवशी म्हणजे बुधवारी दिल्लीत दाखल झाले होते. अमित शहा यांची त्यांनी आदल्याच दिवशी भेट घेतली होती. एकीकडे एकनाथ शिंदे हे अमित शहा यांच्या निवासस्थानी आपल्या सर्व खासदार आणि मंत्र्यांना घेऊन दाखल झाले होते. तर दुसरीकडे त्याच वेळी दिल्लीतील सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक पार पडत होती.

थोडक्यात

  • राष्ट्रवादीला केंद्रात मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा

  • 41 आमदार आल्यानं NCP जास्त खात्यांसाठी आग्रही

  • खाते वाटपासंदर्भात मुंबईत बैठक कधी? याकडे लक्ष

  • राष्ट्रवादीला एकूण किती कॅबिनेट आणि राज्यमंत्रिपदं मिळणार?

विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवार यांचे 41 आमदार निवडून आल्याने जास्तीच्या जागा मिळाव्यात यासाठी प्रयत्न आहेत. सध्या राष्ट्रवादीला ही केंद्रात मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला एकूण किती कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपदं मिळतील याकडे सगळ्याचं लक्ष वेधलं आहे. महायुतीतील प्रमुख नेते हे मुंबईत दाखल झाले आहेत. महायुतीची आज होणारी बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यातील आपल्या मूळगावी दरे तांब येथे पोहोचले आहेत. त्यामुळे खाते वाटपासंदर्भात मुंबईत कधी बैठक होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कोणत्या नेत्यांना कोणतं खातं मिळणार?

  • अजित पवार- अर्थ खाते

  • छगन भुजबळ- अन्न व नागरी पुरवठा

  • अनिल पाटील- आपत्ती व्यवस्थापन

  • अदिती तटकरे- महिला व बालकल्याण

  • हसन मुश्रीफ- वैद्यकिय शिक्षण खाते

  • धनंजय मुंडे- कृषी खाते

  • नरहरी झिरवळ, धर्मरावबाबा आत्राम आणि संजय बनसोडे यांच्यापैकी एकाला क्रिडा खाते मिळण्याची शक्यता

  • दिलीप वळसे पाटील यांना मंत्रिपद मिळणार नसल्याची चर्चा

सविस्तर बातमी पाहण्यासाठी क्लिक करा-

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Saath Nibhana Saathiya Gopi Bahu : 'साथ निभाना साथिया' फेम 'गोपी बहू'ने गुपचुप केले लग्न, जाणून घ्या कोण आहे? जियाचा नवरा

GST Slab : आता अनेक वस्तूंवरील कर दर कमी होणार! GST चे चार पैकी दोन स्लॅब रद्द होणार; सर्वसामान्यांना मोठा दिलासा

Uttar Pradesh Crime : नोरा फतेहीसारखी फिगर मिळवण्यासाठी पतीने केला पत्नीचा छळ; नेमकं प्रकरण काय?

Asia Cup 2025 : ब्रोंको टेस्ट पास करा तरचं संघात चान्स! BCCI चा नवा नियम; ब्रोंको टेस्ट म्हणजे काय? Bronco Test