ताज्या बातम्या

"अजित पवार राजीनामा स्वीकारणार...", धनंजय मुंडेंबद्दल पहिल्या पत्नीचे भाष्य

अनेक राजकीय नेत्यांनी या भेटीसंदर्भात विविध अंदाज मांडले आहेत. यावर धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी करुणा मुंडे यांनीदेखील भाष्य केले आहे.

Published by : Team Lokshahi

सध्या महाराष्ट्रातील राजकारणात धनंजय मुंडे व सुरेश धस यांच्या भेटीबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. मुंडे व धस यांची भेट नक्की कोणत्या कारणामुळे झाली ? याबद्दल अनेक अंदाज व्यक्त केले जात आहेत. अनेक राजकीय नेत्यांनी या भेटीसंदर्भात विविध अंदाज मांडले आहेत. यावर धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी करुणा मुंडे यांनीदेखील भाष्य केले आहे.

करुणा मुंडे म्हणाल्या की, "राजकारणी हे काहीही करु शकतात. पण संतोष देशमुख हत्या प्रकरण दाबण्यासाठी भेट झाली नसावी". त्याचप्रमाणे याच वेळी करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याविषयीदेखील प्रतिक्रिया मांडली.

अजित पवारांबद्दल काय म्हणाल्या करुणा मुंडे?

अजित पवार धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करणार नाहीत. पुरावे असल्याशिवाय ते धनंजय मुंडेंचा राजीनामा स्वीकारणार नाहीत. पण माझ्याकडे पुरावे आहेत. मात्र अजित पवार मला भेटण्यासाठी वेळ देणार नाहीत आणि मी त्यांचा वेळ मागणारही नाही.

पुढे त्या म्हणाल्या की, "संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी सर्वजण लढत आहेत. मी अंजली दमानिया, मनोज जरांगे पाटील सगळे जण लढाई लढत आहेत. त्यांनी आम्ही संतोष देशमुख यांना न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही", असंही त्या म्हणाल्या.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा