राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावर आहेत. जिल्हा प्रशासकीय बैठकीसाठी आज अजित पवार बीडला येणार आहेत. बीड जिल्ह्यात विविध ठिकाणी बैठका आणि उद्घाटन अजित पवारांच्या उपस्थिती होणार आहेत. मात्र अजित पवार यांच्या बीड दौऱ्यात धनंजय मुंडे गैरहजर राहणार आहेत.
धनंजय मुंडे यांनी ट्विट करत याची माहिती दिली की, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री माननीय @AjitPawarSpeaksसाहेब यांच्या आजच्या बीड मधील नियोजित दौऱ्यात मी पूर्ण वेळ उपस्थित राहणार होतो. परंतु, माझी प्रकृती अद्यापही ठीक नसल्याने काल मला उपचारासाठी मुंबई येथे यावे लागले आहे. त्यामुळे बीडमधील आजच्या कार्यक्रमांना मी उपस्थित राहू शकणार नाही. याबाबत मी @Mahancpspeak पक्ष नेतृत्वाला पूर्वसूचना दिली असून, यासंदर्भात कोणताही संभ्रम निर्माण होऊ नये, ही विनंती. असे धनंजय मुंडे म्हणाले.
याच पार्श्वभूमीवर आता पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंकजा मुंडे म्हणाल्या की, "मी इथे आहे ना तुमच्या समोर. दुसऱ्याचे काय चाललं, मला काय माहित. कोणाचं काय चाललंय मला काय माहित. त्यांची तब्येत बरेच दिवस झाली बरी नाही आहे. असे पंकजा मुंडे म्हणाल्या.