ताज्या बातम्या

Ajit Pawar funeral : अजित पवारांना अखेरचा निरोप! केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दाखल

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे बारामतीत चार्टर्ड विमान अपघातात निधन झाले.

Published by : Varsha Bhasmare

महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून टाकणारी घटना बुधवारी (दि. २८) सकाळी घडली. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे बारामतीत चार्टर्ड विमान अपघातात निधन झाले. सकाळी सुमारे ८.४५ वाजता बारामती विमानतळावर लँडिंगदरम्यान विमान कोसळले, या भीषण दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये त्यांचे सुरक्षा रक्षक, दोन पायलट आणि एक महिला क्रू मेंबर यांचा समावेश आहे. अजित पवार हे ६६ वर्षांचे होते.

या अपघाताची बातमी समजताच संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली. बारामतीत वातावरण अत्यंत शोकाकुल झाले असून पवार कुटुंबीय, कार्यकर्ते आणि नागरिकांना अश्रू अनावर झाले. अजित पवार हे आपल्या कडक शिस्तीच्या प्रशासनासाठी, रोखठोक स्वभावासाठी आणि विकासाभिमुख निर्णयांसाठी ओळखले जात होते. त्यांच्या अचानक जाण्याने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

आज सकाळी ११ वाजता विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अजित पवार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंतिम दर्शनासाठी प्रचंड जनसागर उसळला होता. “अजित दादा अमर रहें”च्या घोषणा देत समर्थकांनी अश्रूंनी निरोप दिला. प्रत्येक चेहऱ्यावर दुःख आणि अस्वस्थता स्पष्टपणे दिसत होती.

अजित पवारांच्या अंत्यसंस्कारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह अनेक केंद्रीय व राज्यातील दिग्गज नेते उपस्थित होते. सर्वांनी पवार कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन व्यक्त केले.

खासदार सुनेत्रा पवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, अंत्यविधीवेळी त्यांनी अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी अजित पवारांना भावनिक निरोप दिला. संपूर्ण पवार कुटुंबाने जड अंतःकरणाने आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप दिला. अजित पवार यांचे जाणे हे केवळ एका नेत्याचे निधन नसून, महाराष्ट्राने एक कर्तबगार, अनुभवी आणि धडाडीचा नेता गमावल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा