Ajit Pawar : अजित पवारांचा पिंपरी-चिंचवड दौरा अचानक रद्द, गणेश मंडळांमध्ये नाराजीचं वातावरण Ajit Pawar : अजित पवारांचा पिंपरी-चिंचवड दौरा अचानक रद्द, गणेश मंडळांमध्ये नाराजीचं वातावरण
ताज्या बातम्या

Ajit Pawar : अजित पवारांचा पिंपरी-चिंचवड दौरा अचानक रद्द, गणेश मंडळांमध्ये नाराजीचं वातावरण

मुंबईकडे तातडीने रवाना, पिंपरी-चिंचवडच्या गणेश मंडळांची तयारी व्यर्थ

Published by : Riddhi Vanne

Ajit Pawar's Pimpri-Chinchwad Visit Suddenly Cancelled : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांचा आज (शुक्रवार) पिंपरी-चिंचवड शहरातील नियोजित दौरा अनपेक्षितपणे रद्द करण्यात आला आहे. या दौऱ्यात ते शहरातील अनेक गणेश मंडळांना भेट देऊन दर्शन घेणार होते. मात्र, ठरलेल्या वेळेआधीच म्हणजे दुपारी सव्वा दोनच्या सुमारास, ते तातडीने मुंबईकडे रवाना झाले, यामुळे अनेकांची निराशा झाली. शहरातील सुमारे चाळीस गणेश मंडळांना अजित पवार भेट देणार असल्याने, मंडळांकडून जोरदार तयारी करण्यात आली होती. स्वागतासाठी रंगीबेरंगी फलक, मंडप सजावट, विशेष प्रकाशयोजना आणि कार्यकर्त्यांची गर्दी सगळेच काही जोमात सुरू होते. पण दौरा रद्द झाल्याने हा उत्साह काहीसा मावळल्याचं चित्र दिसून आलं.

अजित पवारांचा दौरा नेमका का रद्द करण्यात आला, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. नियोजनाप्रमाणे ते दुपारी १२:३० वाजता शहरात दाखल होणार होते, परंतु पावणे दोनच्या सुमारास त्यांनी अचानक मुंबईकडे रवाना होण्याचा निर्णय घेतला. शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष योगेश बहल यांनी माहिती देताना सांगितले, “अजितदादांचा दौरा काही तातडीच्या कारणामुळे रद्द करण्यात आला आहे. ते सध्या मुंबईकडे निघाले असून, शहरातील मंडळांना भेट देण्याचा कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे.”

दोन दिवसांपासून मंडळांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये या दौऱ्याची जोरदार तयारी सुरू होती. अनेकांनी याला आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय ताकद दाखवण्याची संधी म्हणून पाहिलं होतं. मात्र दौरा रद्द झाल्यामुळे संपूर्ण नियोजनच अंगलट आलं आहे. या अचानक झालेल्या बदलामुळे अनेक गणेश मंडळांमध्ये निराशा पसरली आहे. “इतक्या दिवसांपासून तयारी करत होतो, पण शेवटच्या क्षणी दौरा रद्द झाला, त्यामुळे खूप वाईट वाटतंय,” अशी भावना अनेक मंडळांतील कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा