ताज्या बातम्या

Akhil Chitre : 'ह्यांच्या गटात एकापेक्षा एक मस्केबाज चमकू भरलेत'; अखिल चित्रेंचा एकनाथ शिंदेंना टोला

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी एकनाथ शिंदे गटावर सडकून टीका केली आहे.

Published by : Rashmi Mane

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी एकनाथ शिंदे गटावर सडकून टीका केली आहे. त्यांनी शिंदे गटाच्या बॅनरचा फोटो एक्स हँडलवर ट्वीट केला असून यामध्ये ही मोदी-शहांची सेना असल्याचे म्हटले आहे. शिंदे गटाच्यावतीने महाराष्ट्राचा हापूस आंबा महोत्सवाच्या उद्घाटन समारंभाचा बॅनर लावण्यात आला आहे. या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिसत आहे. शिवाय खासदार श्रीकांत शिंदे आणि खासदार रविंद्र वायकर हेदेखील बॅनरवर दिसत आहेत. हा कार्यक्रम ३० एप्रिल रोजी दिल्लीतील नविन महाराष्ट्र सदनात पार पडणार असून शिंदे गटाच्या खासदारांनी हा महोत्सव आयोजित केला आहे.

बॅनरवरील चेहरे पाहून अखिल चित्रे यांनी एकनाथ शिंदे गटाला डिवचले आहे. एरव्ही लोकांना भावनिक साद घालताना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंग दिघे यांच्या नावाचा उल्लेख किंवा फोटोंचा वापर केला जातो. मात्र काही ठिकाणी सोयीस्करपणे त्यांच्या फोटोंचा विसर पडतो. त्यामुळे ही मोदी-शहांची सेना असल्याचे चित्रेंनी म्हटले आहे.

काय आहे ट्वीटमध्ये

ही बाळासाहेब ठाकरेंची नव्हे तर...मोदी शहांची सेना!

ही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची नव्हे तर...

मोदी शहांची सेना !

एरव्ही मतांसाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांची आणि धर्मवीर दिघेसाहेबांची तसबीर वापर करणाऱ्यांना आता सोयीस्करपणे त्यांच्या फोटोचा विसर.

ह्यांच्या गटात एकापेक्षा एक मस्केबाज चमकू भरलेत.

#नासकेआंबे

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Monorail : मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार; MMRDAने घेतला महत्त्वाचा निर्णय

Latest Marathi News Update live : राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा

Raj Thackeray - Devendra Fadnavis : राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Pune : पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नवे नाव राजगड; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा ऐतिहासिक निर्णय