अक्कलकोट तालुक्यातील सांगवी येथे कारचा भीषण अपघात झाला आहे. सांगवी बुद्रुक येथे ओमनी कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी झाडाला जाऊन आदळली ज्यामुळे हा अपघात झाला आहे. अपघाती चालकाला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.