Accident Death|Akola Accident  Team Lokshahi
ताज्या बातम्या

अकोल्यात भीषण अपघात; पती-पत्नीचा जागीच मृत्यू

ट्रक चालक पोलिसांच्या ताब्यात

Published by : Shubham Tate

अकोला (अमोल नांदूरकर) : अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर कारंजा रोडवर दुचाकी व ट्रकचा भीषण अपघात झालाय. या अपघातात दुचाकीस्वार असलेल्या पती पत्नी यांचा जागीच मृत्यू झाला, या प्रकरणी मुर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी ट्रक आणि चालकालाही ताब्यात घेतले आहे. (Accidental death Akola)

अकोल्यातील मुर्तीजापूर वरून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या दहातोंडे फाटा येथे आज सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. एमएच ४ टीडी २२८३ क्रमकांचा ट्रक आणि ज्युपिटर क्रमांक एमएच ३७ एस ५७३७ या दोन वाहनांमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील पती-पत्नी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

ही घटना मुर्तीजापूर कारंजा मार्गावरील दहातोंडे फाट्यावर घडली. विनोद वासुदेवराव वानखडे (वय ५५) आणि पत्नी सविता विनोद वानखडे (वय ५०) असं अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. मृतक हे धनज बु जवळील मेहा येथील रहिवाशी आहेत. याची माहिती मूर्तिजापूर येथील आपत्कालीन संस्था सुनील लक्ष वाणी यांना मिळताच त्यांनी रुग्णवाहिका रवाना केली होती.

या प्रकरणी मूर्तिजापुर ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक सत्यजीत मानकर यांनी अपघातची माहिती दिली. अवघ्या काही मिनिटात याला मदद करण्यासाठी भाजप आमदार हरिष पिंपळे द्वारा संचालित आपातकालीन पथक मोफत सहकार्य केले. दोघा पती-पत्नीच्या मृत्यूची माहिती वानखेडे कुटुंबियांना मिळतात, त्यांच्या कुटुंबीयांना चांगलाच धक्का बसला आहे. परिसरात देखील शोकाकुळ वातावरण आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा