सकाळ झाली की सर्वात आधी डोक्यावर हंडा घ्यायचा. मैलोनमैल वाट तुडवत चालत जायचे. खणलेल्या खड्ड्यातून पाणी भरायचे. हे असं जगणं आणि भोगणं अकोल्याच्या कवठा ग्रामस्थांच्या वाट्याला आलेल आहे. मन नदीच्या काठावर खड्डे खोदून त्यातून पाणी भरत इथले लोक आपली तहान भागवत आहे. फक्त बोलायला प्रशासनाने नदीपात्रात विहीर खोदून ठेवल्या आहेत. पण तिच्या शेजारीच सांडपाणी साठते आहे. पाण्याच्या टाक्याही स्वच्छ केल्या जात नाही. त्यातच बसवलेला फिल्टरही अनेक दिवसांपासून बंदच आहे. मग पाणी प्यायचं कसं? असा सवाल इथल्या ग्रामस्थ विचारले.
याचसंदर्भात ग्रामस्थ रंजना घ्यारे या लोकशाही मराठीशी बोलताना म्हणाल्या की, "नदीवर बॅरेज बांधण्यात आलंय, पण त्याचा अजून काहीच फायदा नाही. सकाळी लवकर उठून शेतात मजुरी करायची आणि त्यानंतर रखरखत्या उन्हात पाय भाजत जाऊन खड्ड्यातून पाणी भरायचे असते. या सगळ्या परिस्थितीमुळे कवठा गावातील लोकांचे असह्य हाल मांडले गेलेयत.
त्याचसोबतच तुळशीराम घ्यारे, दयाराम बोरचाटे दोन व्यक्तींना लोकशाही मराठीशी बोलताना म्हणाले की, "सरकारने या गावासाठी पाण्याच्या योजना आणल्या, पण त्या उदानसीनतेच्या डबक्यात बुडून गेल्यायत. आणि लोकांच्या पदरी पडलीय फक्त कोरडीठाक तहान... त्यामुळे, या नदीचं पाणी स्वच्छ कधी होईल आणि पाण्याचा फिल्टर दुरुस्त कधी होईल... याची वाट कवठाचे ग्रामस्थ बघत बसलेयत".