ताज्या बातम्या

Akshay Kumar : बॉलीवूडचं हाऊसफुल्ल डील! आता पुन्हा एका अभिनेत्याने विकली मुंबईतील मालमत्ता

अक्षय कुमार मालमत्ता विक्री: मुंबईतील आठ मालमत्तांवर ₹110 कोटींचा व्यवहार, रिअल इस्टेटमध्ये उत्सुकता.

Published by : Team Lokshahi

Akshay Kumar Property : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने गेल्या सात महिन्यांत मुंबईतील आठ निवासी व व्यावसायिक मालमत्ता विकल्या असून, एकूण व्यवहारांची किंमत सुमारे ₹110 कोटींवर गेली आहे. बोरीवली, वरळी आणि लोअर परळसारख्या प्रमुख भागांतील या मालमत्तांमध्ये आलिशान अपार्टमेंट्स आणि कमर्शियल स्पेस यांचा समावेश आहे.

अक्षय कुमारने बोरीवलीतील Oberoi Sky City प्रकल्पातील तीन 3 BHK अपार्टमेंट्स विकले. जानेवारी 2025 मध्ये त्याने 1,073 चौरस फुटांचे अपार्टमेंट ₹4.25 कोटींना विकले, जे त्याने 2017 मध्ये 2.38 कोटींना खरेदी केले होते. यानंतर मार्चमध्ये आणखी एक अपार्टमेंट 4.35 कोटींना विकले, ज्यावर त्याला 84% परतावा मिळाला. त्याच महिन्यात त्याने एक 3 BHK व एक स्टुडिओ अपार्टमेंट एकत्र ₹6.60 कोटींना विकली, ज्यावर 89% फायदा झाला.

जुलै 2025 मध्ये त्याने पुन्हा दोन अपार्टमेंट्स एकत्र ₹7.10 कोटींना विकली, ही मालमत्ता 2017 मध्ये ₹3.69 कोटींना घेतली होती. या व्यवहारातून त्याला तब्बल 92% परतावा मिळाला. या काळातील सर्वात मोठा व्यवहार म्हणजे वरळीतील Oberoi Three Sixty West प्रकल्पातील 6,830 चौरस फुटांचे लक्झरी अपार्टमेंट, जे त्याने पत्नी ट्विंकल खन्नासह ₹80 कोटींना विकले. या अपार्टमेंटमध्ये चार कार पार्किंग जागाही होत्या.

एप्रिल 2025 मध्ये त्याने लोअर परळमधील One Place Lodha या प्रोजेक्टमधील व्यावसायिक कार्यालय ₹8 कोटींना विकले. हे ऑफिस त्याने 2020 मध्ये ₹4.85 कोटींना घेतले होते, ज्यातून त्याला 65% परतावा मिळाला. अक्षय कुमारच्या या मालमत्ता विक्रीमुळे रिअल इस्टेट क्षेत्रात उत्सुकता निर्माण झाली आहे. ही पावले त्याच्या गुंतवणूक धोरणाचा भाग असल्याचे जाणकारांचे मत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Parliament Session : संसदेच्या अधिवेशनाचा आजपासून तिसरा आठवडा; महत्त्वाच्या विधेयकांवर चर्चा होण्याची शक्यता

Latest Marathi News Update live : आज मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा

Shravan Somwar : Shivamuth : काय आहे श्रावण महिन्यातील 'शिवामूठ' परंपरा?

Army officer Assaulted SpiceJet employees : स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला Video