ताज्या बातम्या

Amol Mitkari: पोलिसांकडून अक्षय शिंदेचं एन्काऊंटर; अमोल मिटकरी यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

पोलिसांकडून अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Published by : Dhanshree Shintre

पोलिसांकडून अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी अक्षय शिंदेवर गोळीबार केला. गोळीबारात आरोपी अक्षय शिंदे याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. बदलापूर अत्याचाराच्या आरोपीचा मृत्यू झाला आहे. अक्षयनं बंदुक हिसकावून पोलिसांवर गोळीबार केला होता. ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरात ही घटना घडली आहे. याच पार्श्वभूमीवर अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

तसेच अमोल मिटकरी ट्विटरवर पोस्ट शेअर करत म्हणाले की, अक्षय शिंदे एनकाउंटर प्रकरणात राजकारण करू पाहणाऱ्या विरोधकांनी अकलेचे तारे तोडायला सुरुवात केली आहे.पोलिसांनी स्वतःच्या स्वसंरक्षणार्थ आरोपीचे एनकाउंटर केले असेल तर पोलिसांना दोष देणारे अक्कलशुन्य म्हणावे लागतील. चिमुरड्यांना अखेर निसर्गानेच न्याय दिला. #सत्यमेवजयते

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Mahesh Manjrekar : 'यांच्या भावनांशी खेळलात, तर याद राखा...'; आज समजणार 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्यानंतर महायुतीचे नेते गोंधळलेले; संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांना टोला

Devendra Fadanvis Podcast : 'एक नवी सुरुवात करतोय...'; मुख्यमंत्री पॉडकास्टच्या माध्यमातून साधणार संवाद, पंढरपुरातून केली घोषणा

Mumbai Mega Block : मुंबईकरांनो! आज लोकलचं वेळापत्रक बघूनच घराबाहेर पडा; तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक