ताज्या बातम्या

Vijay Wadettiwar: पोलिसांकडून अक्षय शिंदेचं एन्काऊंटर; विजय वडेट्टीवार म्हणाले...

पोलिसांकडून अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Published by : Dhanshree Shintre

पोलिसांकडून अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी अक्षय शिंदेवर गोळीबार केला. गोळीबारात आरोपी अक्षय शिंदे याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. बदलापूर अत्याचाराच्या आरोपीचा मृत्यू झाला आहे. अक्षयनं बंदुक हिसकावून पोलिसांवर गोळीबार केला होता. ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरात ही घटना घडली आहे. याच पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

विजय वडेट्टीवार ट्विटरवर पोस्ट शेअर करत म्हणाले की, याची न्यायिक चौकशी झालीच पाहिजे!

अक्षय शिंदे याने गोळी झाडून घेणे म्हणजे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का??

अक्षय शिंदे याने गोळी नेमकी कशी झाडली?

आरोपी अक्षय पोलिसांच्या ताब्यात असताना त्याचे हात बांधले नव्हते का? त्याला बंदूक कशी काय त्याला मिळाली? पोलिस इतके बेसावध कसे असू शकतात?

बदलापूर प्रकरणात एकीकडे संस्थाचालक भाजपशी सबंधित असताना संस्थाचालकांवर कारवाई होत नाही, दुसरीकडे आज आरोपी अक्षय शिंदे स्वतःवर गोळी घालून घेतो हे अतिशय धक्कादायक आणि संशयास्पद आहे..

बदलापूर प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर आमचा पहिल्यापासून विश्वास नाही.

आमची मागणी आहे, आता या प्रकरणाची न्यायिक चौकशी झालीच पाहिजे!

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरू; आजही विविध मुद्द्यांवरुन विरोधक सरकारला घेरणार

Ajit Pawar : 'विकास हाच केंद्रबिंदू मानून आम्ही काम करत आहोत'

Homeopathic Doctor : आजपासून आझाद मैदानात होमिओपॅथी डॉक्टरांचं उपोषण

Shashikant Shinde : शशिकांत शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष