ताज्या बातम्या

Dagdusheth Halwai Ganpati : अक्षय तृतीयेनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपतीला 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य

आज अक्षय्य तृतीया. हिंदू पंचांगात साडेतीन मुहूर्तांना विशेष महत्त्व आहे.

Published by : Siddhi Naringrekar

आज अक्षय्य तृतीया. हिंदू पंचांगात साडेतीन मुहूर्तांना विशेष महत्त्व आहे. अक्षय्य तृतीयेचा दिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यात सुख आणि समृध्दी घेऊन येतो. यादिवशी लक्ष्मीचे पूजन केले जाते तसेच सोने- चांदीच्या वस्तूंची खरेदी देखील केली जाते. असे म्हटले जाते. वैशाख शुद्ध तृतीया हा दिवस अक्षय्य तृतीया म्हणून साजरा केला जातो. यंदा अक्षय्य तृतीया 30 एप्रिल या दिवशी साजरी केली जाणार आहे.

याच पार्श्वभूमीवर अक्षयतृतीयेनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपतीला 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखवण्यात आला आहे. पुण्यातील प्रसिद्ध व्यापारी देसाई बंधू आंबेवाले, मंदार देसाई आणि कुटुंबियांच्या वतीने हा महानैवैद्य देण्यात आला आहे.

आंब्यांची सुंदर, आकर्षक आरास करण्यात आली असून प्रवेशद्वारापासून गाभाऱ्यापर्यंत फुलांची सजावट करण्यात आली असून गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटे पासूनच गर्दी केली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Devendra Fadnavis On Operation Sindoor : "पापांची हंडी फोडणार....", ऑपरेशन सिंदुरवर फडणवीसांचे भाष्य

Accident In Dahi Handi : उत्सवाला गालबोट! अन् खाली पडून एका गोविंदाचा मृत्यू, तर जखमींची संख्या किती

Latest Marathi News Update live : मुंबई- उद्या दुपारी 3 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

Dahi Kachori : आता बनवा घरांच्या घरी बाजारात मिळणारी दही कचोरी