admin
admin
ताज्या बातम्या

कोण बनणार अल कायदाचा प्रमुख?: लादेन, जवाहिरीपेक्षा जाहाल अदेलचे नाव चर्चेत

Published by : Team Lokshahi

अमेरिकेने ड्रोन हल्ला करत दहशतवादी संघटना अल-कायदाचा म्होरक्या अल जवाहिरीचा खात्मा करण्यात आला आहे. २०११ मध्ये ओसामा बिन लादेनला ठार करण्यात आल्यानंतर जवाहिरी अल-कायदाचं नेतृत्व करत होता, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी टि्वट करत ही माहिती दिली. आता अल कायदाच्या उत्तराधिकार्‍यांमध्ये सैफ अल-अदेलचे नाव चर्चेत आहे. तो लादेन, जवाहिरीपेक्षा जास्त धोकादायक आहे.

अल-अदेल हा अल-कायदाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहे आणि संघटनेतील त्याची उपस्थिती देखील मोठ्या प्रमाणात बोलते. अल-अदेल ओसामा-बिन-लादेन आणि अल-जवाहिरीच्या जवळचा मानला जातो. ओसामा-बिन-लादेनच्या मृत्यूनंतर अल-जवाहिरी अल-कायदाचा प्रमुख झाला. आता त्याच्या मृत्यूनंतर या दहशतवादी कारखान्याचा अल कायदाचा पुढचा प्रमुख कोण असेल, याची चर्चा रंगली आहे. या दहशतवादी संघटनेकडे दहशतवाद्यांची कमतरता नसली तरी असा एक दहशतवादीही आहे, जो आता या संघटनेच्या उत्तराधिकार्‍यांच्या यादीत आहे.

अल कायदाच्या उत्तराधिकार्‍यांमध्ये सैफ अल-अदेलचे नाव चर्चेत आहे. अल-अदेल हा अल-कायदाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहे. संघटनेतील त्याची उपस्थिती देखील मोठ्या चर्चेचा विषय असते. मिळालेल्या माहितीनुसार, अल-अदेल ओसामा-बिन-लादेन आणि अल-जवाहिरीचाही जवळचा मानला जातो. मात्र, त्याच्याबद्दल फार कमी माहिती जगासमोर आली आहे. 9/11 च्या दहशतवादी हल्ल्यातही त्याचा हात असल्याचे मानले जात आहे. अल अदेल जेव्हा 30 वर्षांचा होता तेव्हा त्याने मोगादिशू, सोमालिया येथे 1993 चे कुप्रसिद्ध 'ब्लॅक हॉक डाउन' ऑपरेशन केले. या कारवाईत 19 अमेरिकन सैनिक मारले गेले होते. यानंतर जवानांचे मृतदेह रस्त्यावर ओढण्यात आले. 2011 मध्ये ओसामा बिन लादेनच्या हत्येपासून, अल-अदेल अल-कायदामधील एक प्रमुख रणनीतिकार बनला आहे.

देश तोडण्याची भूमिका घेणाऱ्या काँग्रेसला अमित शहांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले; "भारताचं विभाजन..."

Jayant Patil : भुजबळ साहेब नाराज हे आम्ही ऐकून आहे

Summers: उन्हातून घरी आल्यावर चुकूनही करू नका 'या' गोष्टी...

India Alliance Meeting : बीकेसीत इंडिया आघाडीचं शक्तिप्रदर्शन, मविआ उमेदवारांच्या प्रचारासाठी होणार सभा

Anil Deshmukh : तटकरे साहेब हॉटेलमध्ये आमच्या कार्यकर्त्यांना भेटले; आमच्या संपर्कात जरी ते आले तरी आम्ही त्यांना घेणार नाही