ताज्या बातम्या

Operation Sindoor : "आम्ही अल्लाह..."; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर अल कायदाची भारताला धमकी

भारतीय सैन्यदलानं (Indian Army) पाकव्याप्त काश्मीरमध्ये 9 ठिकाणांवर एअर स्ट्राइक केला.

Published by : Siddhi Naringrekar

भारतीय सैन्यदलानं (Indian Army) पाकव्याप्त काश्मीरमध्ये 9 ठिकाणांवर एअर स्ट्राइक केला. भारताविरोधात दहशतवादी हल्ला ज्या ठिकाणी करण्याची योजना तयार करण्यात आली त्या 9 ठिकाणांवर हल्ले करण्यात आले. भारताकडून ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) अंतर्गत पाकिस्तान आणि पीओकेतील 9 दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक करण्यात आला.

भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तान बिथरल्याचे पाहायला मिळत आहे. त्यानंतर आता 'ऑपरेशन सिंदूर'नंतर अल कायदाने भारताला धमकी दिल्याची माहिती मिळत आहे. अल कायदाच्या भारतीय उपमहाद्विप शाखेकडून निवेदन जारी करण्यात आले आहे. अल कायदा संघटनेने भारताला धमकी देत या हल्ल्याचा बदला घेऊ असं म्हटलं आहे.

निवेदनात म्हटले आहे की, 6 मे 2025 च्या रात्री भारताच्या भगवा सरकारने पाकिस्तानातील 6 ठिकाणी हल्ले केले. मशिदी, झोपड्यांना टार्गेट केले गेले. यामध्ये अनेक मुसलमान शहीद आणि जखमी झालेत. आम्ही अल्लाहचे आहोत, त्याच्याकडे परत जाऊ. अल्लाह शहीदांना जन्नतमध्ये जागा देवो, जखमींना लवकर बरे करेल. आमीन..हा हल्ला भगवा सरकारच्या गुन्ह्याच्या यादीतील आणखी एक अध्याय आहे.

यासोबतच पुढे म्हटले आहे की, इस्लाम आणि मुसलमान यांच्याविरोधातील युद्ध नवीन नाही. अनेक वर्षापासून सुरू आहे. भारत आणि काश्मीरच्या मुसलमानांवर अन्याय केला जातो. मोदी सरकारचा सैन्य, राजनैतिक, सांस्कृतिक आणि मीडियातून इस्लाम, मुसलमानांना संपवण्याचा प्रयत्न आहे. इस्लाम आणि मुसलमानांचे रक्षण करू. अन्याय झालेल्यांना मदत करू. आम्ही शपथ घेतो, आम्ही तोपर्यंत लढत राहू जोवर मुसलमानांवर झालेल्या अत्याचाराचा बदला घेत नाही. असे त्यात म्हटले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Devendra Fadnavis on Thackeray Brothers : "ब्रँडचा बॅन्ड वाजवला" मुख्यमंत्र्यांनी ठाकरे बंधूंना खोचक टोला

आजचा सुविचार

North Korea Ban Ice Cream Word : उत्तर कोरियात ‘आईस्क्रीम’ शब्द नॉट अलाऊट! किम जोंग उनचा नवा हुकूम

Lipstick Shades : जाणून घ्या, कोणत्या स्किन टोनवर कोणती लिपिस्टिक सुंदर दिसते