छ.संभाजीनगर - किरीट सोमैया यांच्या व्हिडिओ प्रकरणी मुंबई पोलिसांनी 'लोकशाही' चॅनलच्या संपादकांविरोधातच गुन्हा दाखल केला आहे. याचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. तर, राजकीय वर्तुळातूनही यावर प्रतिक्रिया उमटत आहे.
याच पार्श्वभूमीलर लोकशाही मराठी वृत्तवाहिनीचे संपादक कमलेश सुतार यांच्यावर दबावापोटी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याने ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी निषेध व्यक्त केला आहे. गुन्हा मागे घ्यावा नाहीतर राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.