ताज्या बातम्या

Nashik : असे गुन्हे दाखल होत राहिल्यास पत्रकारांना काम करणे अवघड होईल - अखिल भारतीय पुरोगामी प्रसारमाध्यम संघ

Published by : Siddhi Naringrekar

किरीट सोमैया यांच्या व्हिडिओ प्रकरणी मुंबई पोलिसांनी 'लोकशाही' चॅनलच्या संपादकांविरोधातच गुन्हा दाखल केला आहे. याचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. तर, राजकीय वर्तुळातूनही यावर प्रतिक्रिया उमटत आहे.

याच पार्श्वभूमीवर आता लोकशाही मराठी या वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक,कमलेश सुतार यांच्या विरोधातील गुन्हा तात्काळ मागे घेण्यात यावा अशी मागणी आज अखिल भारतीय पुरोगामी प्रसार माध्यम पत्रकार संघाने नाशिक जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. आज संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शशिकांत पगारे, प्रदेश उपाध्यक्ष सतीश रुपवते, न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्हचे संपादक,विठ्ठल भाडमुखे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना निवेदन देण्यात आले.

श्री सुतार यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या संदर्भात सोशल मीडियावर व्हायरल असलेला व्हिडियोच्या अनुषंगाने वार्तांकन केले. मात्र त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. वार्तांकन करण्याबद्दल गुन्हा दाखल होणे हा पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला आहे. गुन्हे दाखल होत राहिल्यास लोकशाही देशात पत्रकारांना काम करणे अवघड होईल, पुरोगामी प्रसार माध्यम संघ या घटनेचा निषेध करीत आहे. तसेच सुतार यांच्यावर दाखल गुन्हा त्वरित माघे घ्यावा अशी विनंती करीत आहे.

IPL 2024 : अभिषेक-क्लासेनचा झंझावात! वादळी खेळी करून पंजाब किंग्जचा उडवला धुव्वा, हैदराबादचा दमदार विजय

"पाकिस्तानचा झेंडा घेऊन मिरवणाऱ्या उबाठाच्या उमेदवारांवर कारवाई करा"; किरण पावसकरांचा ठाकरेंवर हल्लाबोल

IPL 2024 : आरसीबीने CSK विरोधात रचला इतिहास; टी-२० क्रिकेटमध्ये 'हा' कारनामा करणारा ठरला पहिला संघ

"लोकसभा निवडणुकीच्या चार टप्प्यांमध्ये महाविकास आघाडीनेच बाजी मारलीय"; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा मोठा दावा

"एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करायला तयार होतो"; शरद पवारांच्या विधानाला संजय राऊतांनी दिलं रोखठोक प्रत्युत्तर, म्हणाले...