राज्यभरात गणेशोत्सवाच्या तयारीची लगबग पाहायला मिळते आहे. गणेश चतुर्थीला लाडक्या बाप्पाचे सर्वत्र थाटामाटात आगमन होते. काही ठिकाणी मंडळात तर काही लोक आपल्या घरी बाप्पाचे आगमन करतात. तसेच बाप्पाची 10 दिवस स्थापना करुन त्याची आराधना करतात. बाप्पाविषयी अनेक गोष्टींची माहिती आपण जाणून घेतलेली आहे. पण तुम्हाला हे महित आहे का? की बाप्पाला केवळ 21 मोदकांचाच नाही तर 21 पान देखील दाखवली जातात. या प्रत्येक पानाचे एक वेगळे महत्त्व आहे. ज्याला पत्र पूजा म्हणतात.
असं मानलं जात की, बाप्पाला 21 पान अर्पण केल्याने भक्तांच्या घरात सुख आणि समृद्धी नांदते तसेच गणपती लवकर प्रसन्न होतो. बाप्पाला दाखवल्या जाणाऱ्या प्रत्येक पानाचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. ज्यामध्ये शमी पत्र, भृंगराज पत्र, बेल पत्र, दुर्वा पत्र, बेर पत्रा, धतुरा पत्र, तुळशीची पाने, बीन लीफ, अपमार्गा पत्र, कांताकरी पत्र, सिंदूर पान, तेजपत्ता दालचिनी, अगस्त्य पात्र, कणेर पत्र, केळीचे पान, आक पत्र, अर्जुन पत्र, देवदार पत्र, मारुआ पात्र, कचनार पत्र, केतकी पात्र, या पानांचा समावेश होतो.
असे मानले जाते की या पानांनी पूजा केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात आणि आनंद आणि समृद्धी येते. त्याचसोबत सामान्य दिवशी गणपतीला तुळशीची पाने अर्पण केली जात नाहीत. यामागे एक पौराणिक कथा आहे. एकदा तुळशी आणि गणपतीने एकमेकांना शाप दिला होता. म्हणूनच सामान्य दिवशी गणपतीला तुळशीची पाने अर्पण केली जात नाहीत परंतु गणेश चतुर्थीला ती अपवाद मानली जाते आणि या दिवशी तुळशीची पाने अर्पण करणे शुभ मानले जाते. त्यामुळे गणेश चतुर्थीला गणपतीला तुळशीचे पान अर्पण करणे शुभ मानले जाते.