जगाच्या भविष्याशी निगडित वादग्रस्त भाकीतांमुळे पुन्हा एकदा चर्चेत आलेली आहेत बाबा वेंगा. बल्गेरियामध्ये 1911 साली जन्मलेल्या आणि 1996 साली निधन पावलेल्या या महान भविष्यवेत्त्या यांनी आपल्या जीवनात अनेक भाकीतं केली होती, ज्यात काही खऱ्या ठरल्याचे ऐतिहासिक उदाहरणे आहेत. बाबा वेंगा या बल्गेरियातील अंध ज्योतिषी म्हणून जगभर प्रसिद्ध होते.
1996 मध्ये वयाच्या 86 व्या वर्षी त्यांचे निधन होण्यापुर्वी त्यांनी 5079 पर्यंतची भविष्यवाणी केली होती. त्यांनी केलेल्या अनेक भविष्यवाण्यांपैकी काहींची सांगड नंतरच्या घटनांशी घातली जाते. त्यामुळे त्यांच्या भाकितांबद्दल नेहमीच उत्सुकता निर्माण होते. त्यांच्या नावाने विविध अंदाज मांडले गेले आहेत. यामध्ये अमेरिकेतील 9/11 हल्ला, त्सुनामीसारखे नैसर्गिक संकट, तसेच बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होतील अशी भाकिते केली गेल्याचे सांगितले जाते. त्यामुळेच त्यांच्या पुढील भविष्यवाणींकडे लोकांचे लक्ष वेधले जाते.
बाबा वेंगा यांनी 2024 मध्ये 2025 या वर्षासाठी देखील काही भाकीत भविष्यवाणी लिहली होती. ज्यामध्ये असे लिहले होते की, 2025 मध्ये एलियनशी संपर्क होऊ शकतो. तसेच 2025 मध्ये मानव एलियनचा शोध लाऊ शकतात. मात्र या संबंधीत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून आपल्या आकाशगंगेतील एक रहस्यमय अंतराळयान शास्त्रज्ञांना गोंधळात टाकत आहे.
शास्त्रज्ञांना असे आढळून आले आहे की अवकाशात दिसणारी ही वस्तू मॅनहॅटनच्या आकाराची आहे आणि तिचे वजन अंदाजे ३३ अब्ज टन आहे. सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे ती निकेल टेट्राकार्बोनिल उत्सर्जित करत आहे, जो कोणत्याही धूमकेतूमध्ये पूर्वी न पाहिलेला पदार्थ आहे. हार्वर्ड विद्यापीठातील एका खगोलभौतिकशास्त्रज्ञाने हा आश्चर्यकारक दावा केला आहे की ती एखादी वस्तू नसून एलियन तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेले अंतराळयान असू शकते.
दरम्यान शास्त्रज्ञांनी या आंतरतारकीय वस्तूला 3I/ATLAS असे नाव दिले आहे. 19 डिसेंबर रोजी 3I/ATLAS पृथ्वीच्या सर्वात जवळ असेल. याचपार्श्वभूमिवर नासाने म्हटले आहे की ते पृथ्वीपासून किमान २४० दशलक्ष किलोमीटर अंतरावर असल्याने पृथ्वीला कोणताही धोका नाही. या घटनेपासून, लोक बाबा वांगाच्या एलियन्सबद्दलच्या भविष्यवाणीशी याचा संबंध जोडत आहेत. एलियन्ससोबतच 2026 साठी, बाबा वेंगाने सोन्याच्या वाढत्या किंमती, गृहयुद्ध, आर्थिक अडचणी आणि रोख रकमेची टंचाई इशारा दिला.