आजच्या धकाधकीच्या जीवनात लोकांचे अन्न वस्त्र निवारा बरोबरच मोबाईल ही सुद्धा जीवनावश्यक गरज बनली आहे आणि त्यातच ऑनलाइन शॉपिंगची क्रेझ झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे त्याच्याशी संबंधित समस्या देखील वेगाने वाढल्या आहेत. डिलिव्हरीमध्ये छेडछाड आणि चुकीचे उत्पादन मिळाल्याच्या अनेक तक्रारी सध्या ग्राहकांमध्ये वाढत आहेत. पॅकेज छेडछाडी टाळण्यासाठी ई-कॉमर्स कंपनी अमेझॉन (Amazon ) ने आता एक मोठे पाऊल उचलले आहे. अमेझॉन सतत त्यांच्या पॅकेजिंग प्रणालीमध्ये सुधारणा करत आहे.
याचा सर्वात मोठा फायदा असा की ग्राहकाला त्याच्या ऑर्डरमध्ये काही समस्या आहे की नाही हे लगेच कळणार आहे. हे पाऊल अमेझॉनसाठी गेम चेंजर ठरू शकते. त्यामुळे जर तुम्ही देखील Amazon वरून ऑनलाइन खरेदी करत असाल आणि तुमच्या महागड्या ऑर्डरमध्ये छेडछाड होण्याची चिंता सतावत असेल तर आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. कारण Amazon ने आता एक मोठे पाऊल उचलेले आहे. ज्यामध्ये त्यांच्या पार्सलच्या सुरक्षिततेसाठी एक नवीन स्मार्ट तंत्रज्ञान सादर केले आहे, ज्यामुळे कोणतीही छेडछाड त्वरित लक्षात येणार आहे.
अनेकदा आपण अशी तक्रार ऐकतो की एखाद्या ग्राहकाने मोबाईल ऑर्डर केला आणि त्याच्या पॅकेटमध्ये कोणती तरी दुसरीच स्वस्त वस्तू सापडली. या घटनांमुळे ग्राहकांचा विश्वास तर तुटतो त्याचबरोबर ब्रँडच्या प्रतिष्ठेवरही परिणाम होतो. बऱ्याच वेळा डिलिव्हरी एजंट पॅकेटचा सील गरम करून उघडतात, आतील वस्तू बदलतात आणि नंतर ते पुन्हा सील करतात. ही समस्या सोडवण्यासाठी आता अमेझॉनने ही ठोस पावले उचलली आहेत.
अमेझॉनने आपली पॅकेजिंग प्रणाली अधिक सुरक्षित आणि विश्वसनीय करण्यासाठी छेडछाड प्रतिरोधक तंत्रज्ञान (tamper-resistant technology) बाजारात आणले आहे. या नवीन तंत्रज्ञानाअंतर्गत पॅकेजेसमध्ये विशेष सीलिंग टेप (Amazon package protection sealing tape) वापरली जाणार आहे . याद्वारे ग्राहकाला त्याच्या ऑर्डरमध्ये काही समस्या आहे की नाही हे लगेच कळेल.ही विशेष सीलिंग टेप (Amazon package protection sealing tape) आहे , ज्यावर लहान गुलाबी आणि लाल ठिपके आहे.ही टेप पॅकेजेसला सुरक्षित ठेवण्यास मदत करते. जेव्हा एखादी व्यक्ती सील गरम करून उघडण्याचा प्रयत्न करते तेव्हा हे ठिपके त्यांचा रंग बदलतात. यावरून स्पष्ट होते की पॅकेजमध्ये छेडछाड झाली आहे.
असा प्रकार जर झाला तर सर्वप्रथम पार्सलचा फोटो किंवा व्हिडिओ काढून ठेवा. कारण हा पुरावा म्हणून वापरला जाऊ शकतो.याशिवाय जर गुलाबी ठिपका स्पष्ट दिसत असेल तर पार्सल घेण्यास नकार द्या.ताबडतोब Amazon ग्राहक सेवेशी संपर्क साधा आणि तक्रार नोंदवा.अमेझॉनच्या मते, जर कोणत्याही पॅकेजमध्ये असा ठिपका दिसला तर ग्राहकांनी ते पार्सल स्वीकारू नये. पण ग्राहकांना फक्त हे लक्षात ठेवावे लागेल की जेव्हा कोणतीही मौल्यवान ऑर्डर येते तेव्हा प्रथम ठिपके तपासा आणि त्यानंतरच पार्सल घ्या.